Porvorim Elevated Road Dainik Gomantak
गोवा

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

Porvorim Elevated Road Accident: प्रकल्पाच्या अपयशाची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न सुरू असून, हा केवळ ‘दोषारोपांचा खेळ’ असल्याचा आरोप ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पर्वरी येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या उन्नत मार्गावरील अपघात, वाहतूक निर्बंध आणि पावसामुळे निर्माण झालेल्या पाणी साचण्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. या प्रकल्पाच्या अपयशाची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न सुरू असून, हा केवळ ‘दोषारोपांचा खेळ’ असल्याचा आरोप ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केला.

नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकातून सरकारच्या प्रकल्प नियोजनावर प्रश्न उपस्थित केले. उन्नत मार्ग पूर्ण झाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी भाजपमधील नेते पुढे आले; मात्र उद्घाटनानंतर अपघात आणि अन्य अडचणी समोर आल्यानंतर जबाबदारीपासून दूर जाण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला.

‘आप’चे उपाध्यक्ष सुनील सिग्नापूरकर यांनी या प्रकल्पाला ‘अभियांत्रिकी अपयश’ संबोधत त्याच्या रचनेवर प्रश्न उपस्थित केला. तर उपाध्यक्ष मॅन्युअल कार्दोज यांनी योग्य दिशादर्शक आणि सूचना फलकांच्या अभावाकडे लक्ष वेधले. या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च झाले असून, त्याच्या नियोजनातील त्रुटी आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्यांसाठी सरकारला जबाबदार धरले जाईल, असे ‘आप’ने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT