Iron Ore Mining Goa: कोडली खाणीला पर्यावरणीय मंजुरीपूर्वी मोठी सुनावणी; 377 हेक्टर क्षेत्रात 35 लाख टन लोहखनिज उत्खननाचा प्रस्ताव

Kodli Iron Ore Mining Project: प्रकल्पासाठी लिलावातून मिळालेल्या खनिज क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ ३७७.०६८१ हेक्टर आहे. या क्षेत्रातून दरवर्षी ३५ लाख टन लोहखनिजाचे उत्पादन करण्याचा प्रस्ताव आहे.
Kodli Iron Ore Mining Project
Iron Ore Mining GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोडली येथे जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडतर्फे प्रस्तावित लोहखनिज उत्खनन प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी देण्यापूर्वी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे येत्या २२ ऑक्टोबर रोजी पर्यावरणीय सार्वजनिक सुनावणी घेण्यात येणार आहे. धारबांदोडा तालुक्यातील किर्लपाल-दाबाळ येथील श्री सातेरी पिसाणी देवस्थानाच्या सभागृहात सकाळी १० वाजता ही सुनावणी होईल.

या प्रकल्पासाठी लिलावातून मिळालेल्या खनिज क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ ३७७.०६८१ हेक्टर आहे. या क्षेत्रातून दरवर्षी ३५ लाख टन लोहखनिजाचे उत्पादन करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर ६१.२१ लाख टन माती, दगड व टाकाऊ खडक काढण्याचे, तर एकूण ११७.१ लाख टन उत्खनन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Kodli Iron Ore Mining Project
"Indian Dog Go Back" ओरडत 22 वर्षीय शीख तरुणावर जीवघेणा हल्ला; ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी नराधमांचा नंगा नाच

प्रकल्पामध्ये खनिजावर प्रक्रिया करण्यासाठी चार दगड फोडणी यंत्रे, कोरडी प्रक्रिया व चाळणी प्रकल्प तसेच ओल्या पद्धतीचा खनिज शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचाही प्रस्ताव आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा परिसरातील पर्यावरण, जलस्रोत, वाहतूक, धूळ, आवाज तसेच स्थानिक रहिवाशांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा मुद्दा सार्वजनिक सुनावणीत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

हरकती, सूचना मांडण्याची संधी

सार्वजनिक सुनावणीदरम्यान प्रकल्पामुळे प्रभावित होणारे नागरिक, स्थानिक रहिवासी तसेच अन्य संबंधित व्यक्तींना आपली मते, हरकती आणि सूचना मांडण्याची संधी दिली जाणार आहे. सुनावणीत प्रत्यक्ष बोलू इच्छिणाऱ्यांनी त्यासाठी स्वतंत्र नोंदणी करणे आवश्यक आहे. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

Kodli Iron Ore Mining Project
Goa Climate Technology: गोवा बनणार हवामान तंत्रज्ञानाच्या प्रयोगांचे केंद्र? उद्योग, सरकार आणि शिक्षण संस्थांच्या सहभागातून 3 ते 5 प्रायोगिक प्रकल्पांचा प्रस्ताव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com