Adam Zampa Record: कांगारुचा नवा 'किंग ऑफ स्पिन'! ॲडम झाम्पा ठरला ऑस्ट्रेलियाचा नंबर 1 स्पिनर; शेन वॉर्नचा मोडला मोठा रेकॉर्ड

Adam Zampa Breaks Shane Warne Fastest 200 Wickets Record: ऑस्ट्रेलियाचा स्टार लेग स्पिनर ॲडम झाम्पा याने आपल्या फिरकीच्या जोरावर एक मोठा आणि ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला.
Adam Zampa Breaks Shane Warne Fastest 200 Wickets Record
Adam Zampa RecordDainik Gomantak
Published on
Updated on

Adam Zampa Breaks Shane Warne Fastest 200 Wickets Record: ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 84 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे तीन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी आघाडी घेत मालिका आपल्या नावे केली. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात ऑस्ट्रेलियन संघाने उत्कृष्ट कामगिरी प्रदर्शन केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार लेग स्पिनर ॲडम झाम्पा याने आपल्या फिरकीच्या जोरावर एक मोठा आणि ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला.

झाम्पाने या सामन्यात 9 षटकांत 62 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. या 2 विकेट्सह त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील 200 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. सर्वात जलद 200 वनडे विकेट्स घेण्याच्या बाबतीत झाम्पाने ऑस्ट्रेलियाचा (Australia) महान फिरकीपटू शेन वॉर्नला मागे टाकले. शेन वॉर्नने आपल्या कारकिर्दीतील 125व्या वनडे सामन्यात हा टप्पा गाठला होता, तर झाम्पाने ही कामगिरी अवघ्या 123व्या सामन्यात करुन दाखवली. यासह झाम्पा आता ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जलद 200 विकेट्स घेणारा अव्वल फिरकीपटू बनला.

Adam Zampa Breaks Shane Warne Fastest 200 Wickets Record
AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

जागतिक स्तरावर विचार केल्यास, वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट्स घेणारा झाम्पा हा तिसरा लेग स्पिनर ठरला. या यादीत पाकिस्तानचा सकलेन मुश्ताक (104 सामने) पहिल्या तर अफगाणिस्तानचा राशीद खान (115 सामने) दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या दशकभरापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फिरकीची जादू दाखवणाऱ्या झाम्पाच्या नावे 123 वनडे सामन्यांत 201 विकेट्स आणि 118 टी-20 सामन्यांत 153 विकेट्स आहेत.

Adam Zampa Breaks Shane Warne Fastest 200 Wickets Record
IND Vs AUS: क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची अपडेट! भारत-ऑस्ट्रेलिया मालिका रंगणार; काय आहेत तारखा? जाणून घ्या..

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 षटकांत 6 गडी गमावून 356 धावांचा विशाल डोंगर उभारला होता. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम 112 धावांची शतकी खेळी खेळली, तर कूपर कोनोली आणि कर्णधार मिचेल मार्श यांनी प्रत्येकी 53 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 272 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ॲडम झाम्पाव्यतिरिक्त जोश हेझलवूड, मॅट रेनशॉ आणि कूपर कोनोली यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com