Utpal Parrikar  Dainik Gomantak
गोवा

उत्पल पर्रीकरांसाठी मिळालेली उमेदवारी सोडणार : वाल्मिकी नाईक

'आप'च्या वाल्मिकी नाईक यांची पणजीतून जाहीर झालेली उमेदवारी सोडण्याची तयारी.

दैनिक गोमन्तक

पणजी: उत्पल पर्रीकर यांची आम आदमी पार्टीमध्ये यायची इच्छा असेल तर त्यांना उमेदवारीही देण्याची तयारी पक्षाकडून दाखवण्यात आली आहे. उत्पल पर्रीकर भाजप सोडून आपमध्ये आल्यास मिळालेली उमेदवारी सोडणार असल्याचं वाल्मिकी नाईक यांनी स्पष्ट केलं आहे. वाल्मिकी नाईक यांना आपकडून पणजीत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Utpal Parrikar Latest News)

उत्पल पर्रीकर हे गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र असून पणजीतून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र असं असलं तरीही उत्पल यांच्या उमेदवारीसाठी भाजप अनुकूल नसल्याचं चित्र आहे. भाजप उमेदवारांची पहिली यादी उद्या 19 जानेवारीला जाहीर होणार आहे. सदानंद शेट तानावडे यांनी तशी घोषणा केली आहे. मात्र पणजीतून भाजप (BJP) विद्यमान आमदार बाबूश मोन्सरात यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. यामुळे नाराज झालेल्या उत्पल यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेटही घेतली आहे. मात्र त्यांना पक्षाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.

दरम्यान उत्पल यांच्या याच नाराजीचा फायदा आता विरोधक घेताना दिसत आहेत. भाजपला गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections) धूळ चारण्यासाठी विरोधक प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. यातच भर म्हणून आपकडून उत्पल यांना खुली ऑफर देण्यात आली आहे, ज्यात उत्पल आग्रही असलेल्या पणजी मतदारसंघात उमेदवारी देण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे. नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्पल यांना पाठींबा दिला होता. जर उत्पल भाजपविरोधात अपक्ष निवडणूक लढवणार असतील तर सर्व विरोधकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT