..म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार फोरमचे 10 उमेदवार

प्रश्न जवळपास दोन दशकांपासून प्रलंबित राहिले आहेत
Goa Election
Goa ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : ऑल गोवा शेड्युल्ड ट्राईब ऍक्शन फोरमने जाहीर केले की ते आगामी 2022 गोवा विधानसभा निवडणुकीत 10 मतदारसंघात आदिवासी उमेदवार उभे करणार आहेत. फोरमच्या सदस्यांनी सांगितले की, गोव्यातील (Goa) आदिवासी समुदायांना अनेक घटनात्मक अधिकार नाकारले जात आहेत कारण निवडून आलेले प्रतिनिधी या समस्यांना प्राधान्य देण्यात अपयशी ठरले आहेत.

Goa Election
भाजपने 'या' मतदारसंघातील उमेदवारांसाठी केल पाच तास मंथन, मग..

"गाकूवेध - गावडा कुणबी आणि वेळीप समाजाला एसटीचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही जवळपास 30 वर्षे लढा दिला आणि 2003 मध्ये आम्हाला हा दर्जा मिळाला. परंतु आम्हाला अनुसूचित क्षेत्र घोषित करणे, आदिवासी (Tribal) विभाग स्थापन करणे आणि पुरेसा निधी वाटप असे आमचे घटनात्मक अधिकार दिले गेले नाहीत. राजकीय आरक्षण, आदिवासी समाजाला आजपर्यंत मिळालेले नाही जमीन आणि घराचे हक्क मिळालेले नाहीत. याचे कारण म्हणजे समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी राजकीय (politics) आरक्षण दिले गेले नाही, असे रामकृष्ण जल्मी म्हणाले. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी या आदिवासी समुदायांकडे दुर्लक्ष केले, ज्यामुळे त्यांचे प्रश्न जवळपास दोन दशकांपासून प्रलंबित राहिले आहेत, असे जल्मी म्हटले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com