AAP Declares first list of candidates in Goa Dainik Gomantak
गोवा

'आप'च्या पहिल्या यादीत भंडारी, ख्रिस्तींना प्राधान्य

मतदारांचा आकर्षित करण्यासाठी आम आदमी पार्टीचा फंडा

दैनिक गोमन्तक

पणजी : आम आदमी पार्टीने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत भंडारी आणि ख्रिस्ती उमेदवारांना प्राधान्य दिलं आहे. काल शुक्रवारी जाहीर केलेल्या यादीत 4 भंडारी समाजातील तर 4 ख्रिस्ती उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी आपने वेगळं कार्ड खेळल्याची चर्चाही रंगू लागली आहे.

आपने (Aam Aadmi Party) उमेदवारी दिलेल्या माजी मंत्री एलिना साल्ढाणा यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत आपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना उमेदवारी देत कुठ्ठाळी भागातील ख्रिस्ती वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न आपने(AAP) केला आहे. यासोबतच नावेलीत प्रतिमा कुतिन्हो, बाणावलीत वेन्झी व्हिएगस, आणि कुडतरीमध्ये डॉमनिक गावकर या ख्रिस्ती उमेदवारांनी आपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

दुसरीकडे शिरोड्यातून माजी मंत्री महादेव नाईक, पर्ये मतदारसंघात विश्वजीत कृष्णराव राणे, दाबोळीत मगोपमधून आपमध्ये दाखल झालेले प्रेमानंद नाणोस्कर, वाळपईमध्ये सत्यविजय नाईक या भंडारी समाजाच्या उमेदवारांना आपने संधी दिली आहे. गोव्यात आपचे सरकार स्थापन झाल्यास भंडारी समाजाचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केली होती. आता निवडणुकीतही भंडारी समाजाच्या उमेदवारांना आपकडून संधी दिली जात आहे. पुढील याद्यांमध्येही आपकडून भंडारी समाजातील उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: आजचा 'गोवा' हा पोर्तुगिजांनी 18व्या शतकाच्या अखेरीस काबीज केलेला भूभाग होय; गोवन आधुनिकता

Chimbel Protest: ..भूमिपुत्रांना अवसर येतो तेव्हा त्यांच्यात ‘राखणदार’ अवतरतो! चिंबलवासियांचा लढा आणि तोयार तळे

Damu Naik: 118 सभा, दोन्‍ही जिल्‍हा पंचायतींवर स्‍पष्‍ट बहुमत; 'दामू नाईकां'च्‍या प्रदेशाध्‍यक्षपदाला एक वर्ष पूर्ण

"गोव्याचे पर्यावरण, वन संवर्धनासाठी गरज पडल्यास कायद्यात बदल करु"! CM सावंतांचे प्रतिपादन; ‘गोवा वन विविधता महोत्सवा’चे उद्‌घाटन

वरिष्ठ अभियंत्याला भ्रष्टाचाराच्या चौकशीपासून वाचवण्याचा डाव? 350 कोटींचे घोटाळे रडारवर; ‘युनायटेड गोवन्स'ची सीव्हीसीकडे तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT