माझ्या निवृत्तीच्या चर्चा निराधार : प्रतापसिंग राणे

कॅबिनेट मंत्रिपदाच्या घोषणेनंतर निवृत्तीच्या चर्चांना राणेंकडून पूर्णविराम
Pratapsingh Rane on Political Retirement
Pratapsingh Rane on Political RetirementDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राजकारणातून निवृत्ती घेण्याचा माझा कोणताही विचार नाही, अशा शब्दात प्रतापसिंग राणेंनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी कुणालाही निवृत्ती घेणार असे सांगितलेले नाही, त्यामुळे निवृत्तीचं वृत्त ही केवळ अफवा असल्याचं राणेंनी स्पष्ट केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा कोणताही विचार नसल्याचंही ते म्हणाले आहेत. (Pratapsingh Rane's Statement on Political Retirement)

Pratapsingh Rane on Political Retirement
कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा कधीच मागितला नव्हता : प्रतापसिंग राणे

मी राजकारणातून निवृत्ती घेणार असं कोण म्हणतं असा खडा सवालच प्रतापसिंग राणेंनी विचारला आहे. निवडणुका (Goa Assembly Election) जाहीर होऊद्या मग निर्णय घेईन अशा शब्दात प्रतापसिंग राणेंनी फटकारलं आहे. राजकारणात 50 वर्षं पूर्ण केल्यावर पणजीमध्ये काँग्रेस (Congress) पक्षाने जेव्हा आपला सत्कार केला होता, त्यावेळा आपल्याला विश्रांतीची गरज आहे असे आपण बोललो होतो. मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यास करत आपण निवृत्ती घेणार असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्याचा दावाही राणेंनी केला आहे.

Pratapsingh Rane on Political Retirement
'सावंत सरकारची मानसिकताच भ्रष्ट बनली': कॉंग्रेस

राजकारणातून निवृत्तीच्या प्रश्नावर सडेतोड उत्तर देतानाच प्रतापसिंग राणेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी कधीही केली नसल्याचंही म्हटलं आहे. अजून सरकारने (Goa Government) तसा पत्रव्यवहारही केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र यावर काही पत्रव्यवहार झाल्यावरच बोलणं योग्य असल्याचंही राणेंनी सांगितलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com