AAP

 

Dainik Gomantak

गोवा

गोवा आप'च्या परिवर्तन यात्रेला प्रतिसाद

केजरीवाल यांची ही घोषणा महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून देणार असल्याचा विश्वास आतिशी यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

निवडणूक (Election) प्रचाराचा एक भाग म्हणून आम आदमी पक्षाची (AAP) राज्यभरात ‘परिवर्तन यात्रा’ सुरू आहे. सांताक्रुज येथे झालेल्या परिवर्तन यात्रेत ‘आप’च्या गोवा प्रभारी अतिशी उपस्थित होत्या. सांताक्रुज येथेली यात्रेला महिलांची मोठी उपस्थिती होती. दिल्लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांनी गोव्यासाठी (Goa) दिलेल्या विविध घोषणांची माहिती देताना आतिशी यांनी महिला वर्गासाठी केलेल्या घोषणेवर भर दिला. केजरीवाल यांची ही घोषणा महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून देणार असल्याचा विश्वास आतिशी यांनी व्यक्त केला.

अरविंद केजरीवाल हे जेव्हा गोव्यात येतात, तेव्हा फोडाफोडीचे राजकारण नव्‍हे, तर जनहितासाठी घेतलेल्या निर्णयांची आणि घोषणांच्‍या बातम्‍या छापून येतात. आतिशी यांनी दोन महिन्यांवर आलेल्‍या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी विकासाभिमुख पक्षाला मतदान करून गोव्यात बदल घडवावा, असे आवाहन केले. एक मुलगा म्हणून अमित यांच्‍यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांची जनसेवा वाखाणण्याजोगी आहे. निवडणुकीत त्यांना विक्रमी मताधिक्क्‍यांनी निवडून आणण्‍याचे आवाहन अमित यांच्या आई ज्योती पालेकर यांनी केले.

अमित पालेकर यांच्‍यासारखी व्यक्ती निवडून येऊन विधानसभेत जाणे ही एक गरज आहे. दिल्लीत विविध क्षेत्रात केजरीवाल सरकारने भरीव कामगिरी केली आहे. दिल्ली मॉडेल आता गोव्यात आणायचे आहे आणि यासाठी अमित पालेकर सज्ज झाल्‍याचे नाईक म्‍हणाले. पालेकर यांनी एक लढाई जिंकल्यात जमा आहे, आता आम्हाला दुसरी लढाई जिंकायची आहे.

-महादेव नाईक, माजी मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''जोपर्यंत POK परत मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी...'', कारगिल भूमीवरुन राजनाथ सिंह यांचा हल्लाबोल; सीमापार दहशतवादाचा कायमचा करणार बंदोबस्त

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! सावंतवाडी स्थानकावर तीन सुपरफास्ट गाड्यांना थांबा, 'असं' असेल वेळापत्रक

Raigad Fort History: रायगड जिल्ह्यातील इतिहासावर नवा प्रकाश

Shocking Viral Video: झोपलेल्या शेतकऱ्याच्या शर्टात घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क; थरारक व्हिडिओ व्हायरल

VIDEO: 'द हंड्रेड' स्पर्धेत पाकिस्तानी गोलंदाजाचा नवा ड्रामा! उस्मान तारिकच्या बॉलिंग ॲक्शनवर टिम डेव्हिडचा संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT