Goa Election 2022 Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसच्या पाठोपाठ 'आप'नेही लपवले उमेदवार

गोव्यात त्रिशंकू विधानसभेचा अंदाज आल्याने, 2017 ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांचे विलगीकरण करण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेसने गोव्यातील आपल्या उमेदवारांना एका रिसॉर्टमध्ये हलवल्यानंतर, आता आम आदमी पार्टीनेही स्वतःच्या उमेदवारांना सावध ठेवण्यासाठी हालचाली केल्या आहेत.

गोव्यात त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे तसेच भाजपशी काँग्रेसची लढत होण्याचा अंदाज आल्याने, 2017 ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आप आणि काँग्रेस या दोघांनीही आपापल्या उमेदवारांचे विलगीकरण केले आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांना उत्तर गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये हलवले आहे, जिथे ते गुरुवारी मतमोजणी संपेपर्यंत आणि निकाल लागेपर्यंत राहतील. एक्झिट पोलमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला तीन जागा मिळण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे - अश्या परिस्थितीत तृणमूल काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत येऊ शकते.(AAP and Congress defend their candidates in Goa)

एक्झिट पोलनुसार, आम आदमी पार्टी जागा न मिळण्याची शक्यता जास्त आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी गोव्यात असलेले काँग्रेसचे (Goa Congress) ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी काल पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की त्यांचा पक्ष देखील "उमेदवार चोरणाऱ्यांविरुद्ध" सावध आहे. 2017 च्या निवडणुकीच्या निकालांचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले, काँग्रेस एकच सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊनही गोव्यात सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरला. दरम्यान, काँग्रेस नेते आपल्या पक्षाची दुप्पट काळजी घेत असुन, यावेळी नेत्यांची "चोरी" होऊ देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. ‘भाजपविरोधी (Goa BJP) आघाडी’साठी काँग्रेसही इतर पक्षांच्या संपर्कात आसल्याच्या चर्चा समोर येत आहेत.

ते पुढे म्हणाले, "आमच्या पक्षाचे गोवा नेते इतर पक्षांच्या गोव्यातील नेत्यांच्या संपर्कात आहेत". तृणमूलने याआधी सत्ताधारी भाजपशी सामना करण्यासाठी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या युतीचा प्रस्ताव दिला होता. परंतु चिदंबरम यांनी गोव्यात युतीचा प्रस्ताव "विचार केला गेला नाही" असे सांगून पक्षाला फटकारले होते कारण त्यांनी काँग्रेस मधील लुझिन्हो फालेरो सारख्या नेत्यांची 'शिकार' केली होती. 40 सदस्यीय गोवा विधानसभेसाठी (Goa Assembly) 14 फेब्रुवारी रोजी निवडणूक झाली आणि 10 मार्च रोजी निकाल जाहीर होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT