भाजपला गोव्यात निकालाची धाकधूक, काँग्रेस नेते मात्र रिलॅक्स मोडमध्ये

एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचं पारडं जड, गोव्यात काँग्रेसला विजयाचा विश्वास
Michael Lobo on Bambolim Beach
Michael Lobo on Bambolim BeachDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यातच माजी मंत्री आणि काँग्रेसचे कळंगुटमधील उमेदवार मायकल लोबो बुधवारी बांबोळी बीचवर व्यायाम करताना दिसून आले. याच ठिकाणी गोव्यातील काँग्रेसचे सर्व उमेदवार आणि नेते सध्या वास्तव्यास आहेत. हायकमांडकडून निवडणूक होत असलेल्या सर्व राज्यांमध्ये बारीक नजर ठेवली जात असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांना गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर येथे पाठवण्यात आलं आहे.

Michael Lobo on Bambolim Beach
गोव्यात मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये निकालाआधीच 'रस्सीखेच'

कर्नाटकमधील काँग्रेसचे प्रमुख नेते डी के शिवकुमार यांच्यावर गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती आहे. तर काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, छत्तीसगडमधील ज्येष्ठ नेते टी एस सिंग देव आणि विन्सेंट पाला यांच्यावर मणिपूरची जबाबदारी देण्यात आली आहे. तर वरिष्ठ नेते अजय माकन आणि प्रवक्ते पवन खेया यांना पंजाबमध्ये पाठवण्यात आलं आहे. राज्यसभा खासदार दीपेंदर सिंग हु़डा यांना देहराडून येथे पाठवण्यात आलं आहे.

काँग्रेसने (Congress) सर्वच उमेदवारांकडून पक्षांतर न करण्याबाबतचं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं आहे. मात्र असं असलं तरी मध्यंतरीच्या काळात मायकल लोबो हे गृहमंत्री अमित शाह यांच्या संपर्कात असल्याचंही बोललं जात होतं. मात्र अखेर पत्रकार परिषद घेऊन मायकल लोबोंना या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट करावं लागलं होतं. भाजप अफवा पसरवण्यात माहीर असून सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपकडून विनाकारण अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप लोबोंनी केला होता.

निकालाआधीच अफवा पसरवणाऱ्या भाजपची (BJP) कीव येते अशा शब्दात लोबोंनी गोव्यातील भाजप नेत्यांचा समाचार घेतला होता. गोव्यातील जनतेला माहित आहे की भाजप अफवा पसरवण्याचं काम करतेय. त्यामुळे ती भाजपच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही. भाजपने कितीही प्रयत्न केला, युक्त्या लढवल्या, तरी काँग्रेसमधील एकही आमदार फुटणार नाही असा विश्वासही मायकल लोबोंनी व्यक्त केला होता.

Michael Lobo on Bambolim Beach
निकालासाठी उरले काही तास, दक्षिण गोव्यात धाकधूक वाढली

दरम्यान भाजप काँग्रेसच्या उमेदवारांना फोडण्याचा प्रयत्न करु शकते. मात्र काँग्रेसचा एकही उमेदवार भाजपसोबत जाणार नाही असा विश्वास गोवा (Goa) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला होता. भाजपमध्ये मात्र काही नेते आहेत जे सत्तेसाठी हपापलेले आहेत, जे आम्ही सरकार स्थापन केल्यास आमच्यात येतील असंही चोडणकर म्हणाले. मात्र काहीही झालं तरी आम्ही गोव्याच्या जनतेने दाखवलेला विश्वास तोडणार नाही, असं गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com