Goa: AAP held agitation in Panaji  Dainik Goamantak
गोवा

Goa: महिलांच्या संरक्षणात गोवा सरकार अपयशी

राज्यात महिलांवरील (Goa State) वाढत्या गुन्ह्यांविरोधात झालेल्या आंदोलनात आम आदमी पार्टी (Aam Admi Party) नागरिकांसोबत उभी आहे

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात महिलांवरील (Goa State) वाढत्या गुन्ह्यांविरोधात झालेल्या आंदोलनात आम आदमी पार्टी (Aam Admi Party) नागरिकांसोबत उभी आहे. पणजीत ४ ऑगस्ट रोजी तरुण आणि नागरिकांनी राज्यातील महिलांवरील गुन्ह्यांबद्दल आणि भाजप सरकारच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी एकत्र येत आंदोलन केले.

मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे त्यांच्याविरुद्धची आंदोलन बंद करण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त आहे. मात्र, महिला आणि मुलांचे संरक्षण करण्यासाठी मनुष्यबळ नाही, असा आरोप ‘आप’ने यावेळी केला. पणजीत आझाद मैदानावर बुधवारी ‘युथ ॲण्ड सिटिझन ऑफ गोवा’ यांच्या वतीने मेणबत्ती प्रज्वलित करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. (Goa Govt) यावेळी ‘आप’चे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

एका आठवड्यात ३ बलात्कारांची नोंद झाल्यानंतर (Goa Rape Case) आठवड्याभरानंतर महिलांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल आश्वासन देण्यासाठी ठोस कारवाई न केल्याने नागरिक संतापले आहेत. बलात्कार करणाऱ्यांचा निषेध करण्याऐवजी बलात्काराचा दोष पीडितांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टाकला आणि मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यांच्या वक्तव्याबद्दल माफीही मागितलेली नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला.

गोव्यातील महिलांबाबत सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हांबरे म्हणाले. यावेळी प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या, राज्य महिला आयोगसुद्धा निष्क्रिय आहे. एक असे मुख्यमंत्री ज्यांना यामध्ये किमान स्वारस्य देखील नाही, ते या प्रकरणात न्याय कसा देऊ शकतात? मुख्यमंत्री हे पीडितांना दोषी ठरवणारे असंवेदनशील विधान कसे करू शकतात?

आपचे प्रवक्ते वाल्मिकी नाईक (Valmiki Naik) म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी बलात्कार रोखण्यासाठी आणि महिलांच्या संरक्षणापेक्षा हा विरोध दडपण्यात जास्त वेळ घालवला आहे. जर आंदोलकांना दडपण्यासाठी पोलिस दल मोठ्या संख्येने उपस्थित राहू शकते तर ते रस्त्यावर गस्त का घालत नाहीत? मुख्यमंत्र्यांची विधाने महिलांना हानी पोहचवणारी आहेत, असे ‘आप’च्या नेत्या सेसिल रॉड्रिग्स (Cecil Rodriguese) म्हणाल्या. २१ व्या शतकात महिलांना सुरक्षिततेचे आश्वासन देण्याऐवजी, त्यांनी घरातच राहावे असे मुख्यमंत्र्यांना वाटते, असेही रॉड्रिग्स म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT