Panjim: मेघालय राज्याचे (Meghalaya State) पशुपालन खात्याचे मंत्री (Animal Husbandry Minister) शनबोर शुलाई (Shanber Shulai) यांनी चिकन व अंडी खाण्यापेक्षा गोमांस खा (Cow meat) असे जे निवेदन केले आहे, त्याचा निषेध आज गोवंश रक्षा अभियान गोवा तर्फे करण्यात आला. त्याचबरोबर उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित राय यांना निवेदन देऊन मेघालयाच्या या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून त्वरित निलंबित करावे (Demand for Remove from the Cabinet) व धार्मिक भावना दुखावल्याबद्दल (Hurting religious feelings) त्याला अटक करावी अशी मागणी निवेदनातून अभियानाने केली आहे. गोवंश रक्षा अभियान गोवाचे (Goa) अध्यक्ष हनुमंत परब यांनी आझाद मैदान येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यावेळी प्राणीमित्र अमृतसिंग, पशुराम सेना गोमंतकचे निमंत्रक शैलेंद्र वेलिंगकर व इतर गो - प्रेमी उपस्थित होते.
घटनेमध्ये गाईंचे संरक्षण करण्याचे सांगितलेले असताना भारतीय जनता पक्षाचा मेघालय सरकारमधील एक मंत्री जाहीरपणे गो मांस खा म्हणून सांगतो. हा हिंदुधर्माचा (Hindu Religious) तसेच घटनेचा अपमान असून आहे त्यामुळे त्यांना त्वरित मंत्रिमंडळातून निलंबित करावे त्याच बरोबर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करावा अशी आमची अभियानाची मागणी असून त्याबाबतचे निवेदन गोव्याचे राज्यपाल (Goa Governor) तसेच मुख्यमंत्री (Goa CM) आणि मेघालयाच्या राज्यपालांनाही (Meghalaya Governor) पाठवण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगितले. गोव्यातील काही मंत्रीही गोमांस खाण्याची वकालत पुन्हा-पुन्हा करत असल्याचे सांगून मायकल लोबो यांनी यापुर्वी असे विधान केले आहे तसेच आमदार विजय सरदेसाई हे खाटीकांना संरक्षण देत आहेत .या दोघांच्या बरोबरच जे आमदार गोवंश विरोधात आहेत त्यांच्याविरुध्द येत्या निवडणुकीत प्रचार केला जाईल अशी माहिती परब यांनी यावेळी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.