Sal River Dainik Gomantak
गोवा

Goa: साळ नदीला गतवैभव प्राप्त करुन देणार, आप पक्षानं जाहीरनाम्यातून केलं स्पष्ट

साळ नदी (Sal River) ही सालसेत मधील पाण्याचा मुख्य स्त्रोत असला तरी ही नदी सद्या अस्वच्छतेच्या गराड्यात सापडली असुन ती स्वच्छ करण्यावर कोणीही प्रामाणिकपणे पुढाकार घेत नाहीत.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा - साळ नदी (Sal River) ही सालसेत मधील पाण्याचा मुख्य स्त्रोत असला तरी ही नदी सद्या अस्वच्छतेच्या गराड्यात सापडली असुन ती स्वच्छ करण्यावर कोणीही प्रामाणिकपणे पुढाकार घेत नाहीत. आम आदमी पक्ष ही नदी स्वच्छ करुन तिला गतवैभव प्राप्त करुन देणार असे पक्षाच्या जाहीरनाम्यात नमुद करण्यात येईल असे आम आदमी पक्षाचे दक्षीण गोव्याचे निमंत्रक वेन्झी व्हिएगश यानी सांगितले. 

ही नदी 16 किमी लांब असुन तिचा उगम वेर्णा पठारावरुन सुरु होत असुन वेर्णा, नुवे, मुंगुल, सारावली, कोलवा मडगाव, नावेली, बाणावली, वार्का, ओर्ली, करमोणा, केळशी, धर्मापुर, असोळणा, मोबोर नंतर बेतुल येथील अरेबियन समुद्रामध्ये संपते. 

या नदीच्या पाण्यात मलनिस्सारण वाहिनीतील गढुळ व अस्वच्छ पाणी मिसळते. त्यासाठी मलनिस्सारण वाहिनीची दुरुस्ती करणे जास्त महत्वाचे आहे. या वाहिनीतुन जिथुन पाणी झिरपते ते सर्वप्रथम बंद केले पाहिजे. त्यासाठी स्वच्छ करण्यासाठी नैसर्गीक प्रक्रियेची आवश्यकता आहे असे व्हिएगश यानी सांगितले.

आम आदमी पक्षाने दिल्लीतील तलावासाठी ही प्रक्रिया परिणामकारक वापरली असुन तशाच प्रकारची प्रक्रिया येथे कार्यान्वित केली जाईल असेही व्हिएगश यानी स्पष्ट केले. या नदीतील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी सतत लक्ष केंद्रीत केले पाहिजे. वर्षातुन एक दोनदा केवळ पाण्यातील गाळ उपसुन भागणार नाही असेही व्हिएगश यानी सांगितले. 

ही प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी कमीत कमी दोन वर्षे लागतील. पण त्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हितावह ठरेल असे त्याने शेवटी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT