Atishi Sing Goa Visit
मडगाव: आम आदमी पक्षाने दिल्लीनंतर गोव्यातही काँग्रेसपासून दोन हात दूर राहणेच पसंत केले आहे. आगामी निवडणुकीत या पक्षाने ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. येणारी जिल्हा पंचायत आणि त्यानंतर येणारी विधानसभा निवडणूक ‘आप’ स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा या पक्षाच्या केंद्रीय नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी सिंग यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केली.
आमचा पक्ष गोव्यात विधानसभा, जिल्हा पंचायत व पालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे.काँग्रेस हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नाही. त्यामुळे आम्ही या पक्षाशी कशी युती करू शकतो? असा सवाल आतिषी यांनी केला. पक्षाच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या.
यावेळी ‘आप’चे गोवा राज्य प्रमुख अमित पालेकर, आमदार व्हेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा, बाणावली जिल्हा पंचायत सदस्य जोसेफ पिमेंतो उपस्थित होते.
भाजपचे नेते बी. एल. संतोष हे गोव्यात आले असता त्यांना याच सरकारातील एक माजी मंत्री भेटून आल्यानंतर सांगतो की ‘एका लहान कामासाठी एका मंत्र्याने लाखोंची लाच घेतली’. यावरून गोव्यातील भाजप सरकारमधील भ्रष्टाचार कुठल्या स्तरावर पोहोचला आहे हे समजते.
‘आप’च्या नेत्या आतिषी यांनी गोव्यात काँग्रेसबरोबर आघाडी करणार नसल्याचे सांगितले असे ऐकिवात आले आहे. त्यांनी ती भूमिका कोणत्या मुद्यावर मांडली हे माहीत नाही. कारण ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष काही आठवड्यांपूर्वी आघाडीची व एकत्रित लढण्याची भाषा बोलत होते. त्यामुळे आतिषी यांनी स्थानिक राजकीय स्थिती जाणून घेतली की नाही, हे माहीत नाही. निवडणुकीवेळी काँग्रेसने आघाडी काँग्रेसबाबतचा निर्णय केंद्रातील वरिष्ठ नेते घेतात. त्यामुळे आपण त्यावर काही अधिक बोलू शकत नाही.अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हेच स्वतः आपल्याच पक्षातील लोक भाजपसाठी काम करतात असे सांगत आहेत. त्यामुळे काँग्रेसवर किती विश्वास ठेवावा? २०२७ मध्ये विरोधकांनी एकत्रितपणे लढल्यास भाजपला पराभूत करता येईल, हे आपण बोललो असलो तरी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे युती कोणाबरोबर करावी, हा प्रश्न उपस्थित होतो.ॲड. अमित पालेकर, ‘आप’चे गोवा राज्य प्रमुख
२०२२च्या विधानसभा निवडणुकीत गोमंतकीयांनी ‘आप’चे दोन आमदार निवडून दिले होते. हे आमदार कुठल्याही आमिषाला बळी पडलेले नाहीत आणि भाजपमध्येही गेले नाहीत. उलट काँग्रेसचे ११ आमदार जिंकून आले व त्यातील आठजण भाजपमध्ये गेले. त्यामुळे हा पक्ष विश्वास ठेवण्यासारखा नाही.आतिषी सिंग, ‘आप’च्या नेत्या
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.