Goa AAP: दिल्लीतील पराभवानंतर 'आप' बॅकफुटवर; गोव्यात काँग्रेससोबत आघाडी? नेत्याचं सूचक विधान

Goa Aap: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आत्ताच हालचाली सुरु करण्याची गरज असल्याचे मत आपचे नेते व्यक्त करताना दिसत आहेत.
Amit Palekar After Delhi Election Defeat
Goa AAP President Amit PalekarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: 'दिल्लीत आम आदमी पक्ष काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढला असता तर फायदा झाला असता', असे मत गोवा आपचे संयोजक अमित पालेकर यांनी मांडले आहे. एवढेच नव्हे तर गोव्यात येत्या निवडणुकीसाठी आपला काँग्रेससोबत युती करावी लागेल, असेही पालेकर म्हणाले.

दहा वर्षे सत्ता असलेल्या आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठा धक्का बसला आहे. भाजपने २७ वर्षानंतर कमबॅक केले आहे. ७० पैकी ४८ जागा मिळवत भाजपने बहुमताचा आकडा पार केला तर, आपला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले. आपच्या पराभवानंतर अमित पालेकर बोलत होते.

काही जागांवर आप उमेदवाराच्या पराभवातील मतांचा फरक लक्षात घेता काँग्रेस आणि आप एकत्र असते तर फायदा झाला असता, असे मत पालेकरांनी मांडले.

Amit Palekar After Delhi Election Defeat
Delhi Election Result: मतदारांनी झाडू फिरवला; दिल्लीत 'आप'चा सुपडा साफ, भाजपचं कमबॅक; पराभवात काँग्रेसचं सातत्य, 5 मुद्दे

दिल्लीत अँटी इनकम्बन्सी आणि इतर मुद्दे देखील होते. आपण विविध मुद्यांना हलक्यात घेतले. हा निकाल पूर्ण अनपेक्षित होता, असे मत पालेकरांनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना मांडले.

दरम्यान, दिल्लीचा निकाल आपच्या जिव्हारी लागल्याचे दिसत असून, आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आत्ताच हालचाली सुरु करण्याची गरज असल्याचे मत आपचे नेते व्यक्त करताना दिसत आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून गोव्यात प्रवेश केला. पहिल्या निवडणुकीत पक्षाला फारसा प्रभाव पाडता आला नाही. पण, २०२० साली झालेल्या बाणावली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवता आले. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत वेळ्ळी आणि बाणावली येथून पक्षाचे दोन आमदार निवडून आले.

Amit Palekar After Delhi Election Defeat
Pramod Sawant: '2047 पर्यंत दिल्ली आणि गोव्यात भाजपच सत्तेत राहणार'; मुख्यमंत्री सावंतांना विश्वास

काँग्रेसला आप त्यांचा विरोध पक्ष असल्याचे वाटते पण, मुळात दोघांचा मोठा विरोधी भाजप आहे. काँग्रेसच्या भूमिकेमुळे भाजपला अप्रत्यक्ष फायदा झाला. आम्ही गोवा विधानसभेच्या आगमी निवडणुकीकडे सकारात्मक पद्धतीने पाहत असून, येथील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसोबत आमचे चांगले संबंध आहेत, असे पालेकर एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले.

दिल्ली निकालाचा गोव्यात प्रभाव दिसेल का? असा प्रश्न केला असता, गोव्यातील लोक वेगळे आहेत, येथील प्रश्न वेगळे आहेत. गोव्यासाठी काँग्रेसला सोबत घेणे हाच पर्याय दिसत आहे. केंद्रीय नेत्यांनी देखील याचा विचार करावा. वास्तवाचा सामना करायला हवा, असे पालेकर म्हणाले. दरम्यान, मद्य धोरण घोटाळ्याचा दिल्ली निवडणुकीत आपला फटका बसला नाही, असा दावा देखील पालेकरांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com