Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: प्रत्येक कुटुंबाला दरमहा 15 हजारांचा लाभ! सत्तेत येताच मोफत वीज देण्याचे 'आप'चे आश्वासन

Aam Aadmi Party Goa: वाढत्या महागाईविरोधात आम आदमी पक्षाच्‍या (आप) गोवा शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महागाई मुक्ती यात्रे’चा गुरुवारी श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसरातून शुभारंभ करण्यात आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

चावडी: वाढत्या महागाईविरोधात आम आदमी पक्षाच्‍या (आप) गोवा शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महागाई मुक्ती यात्रे’चा गुरुवारी श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसरातून शुभारंभ करण्यात आला.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, अनुसूचित जमाती आघाडीचे अध्यक्ष राजेश गावकर, बाणावलीचे आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आयोजित ‘लोकांचो एकवोट’ कार्यक्रमात नागरिकांनी वाढत्या महागाईमुळे दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. कार्यक्रमाच्या अखेरीस शेकडो नागरिकांनी वीजबिले जाळून महागाईविरोधात निषेध व्यक्त केला. मे २०२७ मध्ये आपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर वीज मोफत करेपर्यंत वीजबिले न भरण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

१९ डिसेंबरपर्यंत राज्यभर यात्रा

‘महागाई मुक्ती यात्रे’च्या माध्यमातून आपचे नेते आणि कार्यकर्ते १९ डिसेंबरपर्यंत संपूर्ण गोव्यात प्रवास करणार आहेत. वाढत्या महागाईचा सामान्य जनतेवर होणारा परिणाम जाणून घेणे आणि जनतेचे प्रश्‍‍न सरकारपर्यंत पोहोचविणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्‍यात आले.

मोफत बसप्रवासही

वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी ‘आप’च्या हमी योजनांद्वारे प्रत्येक कुटुंबाला दरमहा १५ हजार रुपयांचा लाभ दिला जाईल.

मोफत वीज, महिलांना दरमहा तीन हजार रुपयांची आर्थिक मदत व मोफत बसप्रवास अशा योजना सुरू करू, अशी ग्‍वाही देण्‍यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोण होणार मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन? रोहित, सूर्या की बुमराह? सायंकाळी 5.45 वाजता अधिकृत घोषणा, चाहते म्हणतायत 'मुंबईचा राजा'च पुन्हा गादीवर बसणार!

Goa Politics: काँग्रेसचे 'घर-घर चलो अभियान', मडगावातील संविधान बचाव सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

खरी कुजबुज: मुख्यमंत्री अन् गोमंतकीय वारसा

AI Education: विद्यार्थ्यांसाठी एआयचा नवा मंच! 'आयाम क्लब'मधून 12 सर्जनशील कौशल्यांचे प्रशिक्षण

VIDEO: ऑटोग्राफ देण्यासाठी गेला अन्... चाहत्यांनी थेट कृणाल पांड्याच्या अंगावर भिरकावला बूट; थोडक्यात बचावला, पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT