Aakash BYJU'S Students Dainik Gomantak
गोवा

Junk the Plastic Campaign: गोवा मिरामार येथे 'आकाश बायजूस'तर्फे किनारा स्वच्छता मोहिम

Goa Clean Beach: मिरामार किनाऱ्यावरील प्लास्टिक कचरा गोळा करुन हटवण्यात आला.

दैनिक गोमन्तक

Goa Clean Beach: देशातील आघाडीची परीक्षा तयारी शिक्षण सेवा देणाऱ्या ‘आकाश बायजूसने काल मिरामार किनाऱ्यावर जंक दी प्लास्टिक या मोहिमेस प्रारंभ केला. यावेळी किनाऱ्यावरील प्लास्टिक कचरा गोळा करून हटवण्यात आला.

मिरामारसारख्या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देत असतात, अशा ठिकाणी प्लास्टिक कचरा समस्या गंभीर बनली आहे. प्लास्टिकच्या पर्यावरणावरील दुष्परिणामांबाबत जागृती व प्लास्टिकचा पुनर्वापर, पुनःप्रक्रियेच्या प्रयत्नांना प्रोत्साहनाचा संदेश या मोहिमेतून दिला.

गत आठवड्यात मुंबईतील जुहू किनाऱ्यावर या मोहिमेचे उद्‍घाटन झाले होते. या आठवड्यात पणजी आणि कोझिकोड-केरळ येथील किनाऱ्यांची स्वच्छता करण्यात आली. प्लॉगिंग मोहिमेअंतर्गत आकाश बायजूस (पणजी व मडगाव) दोन केंद्रांतून 100हून अधिक विद्यार्थ्यांनी संकलन केले.

अमित सिंह राठोड, ‘आकाश बायजूस’चे विभागीय संचालक-

‘आकाश बायजूस’मध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक उद्दिष्टपूर्तीबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच आदर्श नागरिक घडवण्याची जबाबदारी असल्याचे आम्ही मानतो. याचाच एक भाग म्हणून स्वच्छता मोहीम राबवली. देशातील इतर किनारी शहरांतही अशी मोहीम राबवण्याचा विचार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT