Goa Fire News: शॉट सर्किटमुळे घराला भीषण आग; अग्निशमन दलाच्या सर्तकतेमुळे मोठा अनर्थ टळला

म्हापसा खडपावाडो-कुचेली येथील घटना
Fire In Home
Fire In HomeDainik Gomant

Mapusa : खडपावाडो-कुचेली येथील एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. या भीषण आगीत घरातील सामान जळून 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला. तर जवानांनी सुमारे 5 लाख रुपयांची मालमत्ता वाचविली.

Fire In Home
Travel Tourism Association of Goa: दादागिरी करणाऱ्या टॅक्सीवाल्यांचे परवाने रद्द करा! अन्यथा पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतील

म्हापसा अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास खडपावाडो येथील एका घराला आग लागल्याचा फोन आला. अग्निशमन दलाचे जवान प्रकाश कान्नाईक यांच्यासह नितीन चोडणकर, अमित सातार्डेकर, विष्णू नाईक व संजय फडते यांनी घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. या भीषण आगीत घरातील सोफा सेट, कपाट, वीजवाहिन्या, टीव्ही, घराचे छप्पर जळून दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दलाच्या जवानांनी दिली. जवानांनी सुमारे 5 लाख रुपयांची मालमत्ता वाचविली आहे. या आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. तर शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज घरातील व्यक्तींनी व्यक्त केला

Fire In Home
Goa Mining : गोव्यातील खनिज लिलाव प्रक्रियेसाठी 'त्या' याचिका कारणीभूत

दरम्यान, अशीच एक आग लागल्याची घटना 12 डिसेंबर रोजी सकाळी पणजी काकुलो मॉल, सांतिनेज परिसरात एका हार्डवेअर गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर थोड्याच वेळात अग्निशमन दलाचे जवान दाखल होत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या आगीत गोदामातील साहित्य अधिक प्रमाणात जळाल्याने मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com