Accident Death:  Dainik Gomantak
गोवा

Accident Death: आंदोलनानंतर गतिरोधकावर रंगकाम करण्याची ग्वाही

Accident Death: धारबांदोडा येथे तरुणीच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग

दैनिक गोमन्तक

Accident Death: धारबांदोडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धोकादायक गतिरोधकामुळे सोमवारी एका तरुणीचा बळी गेल्याने मंगळवारी सकाळी स्थानिकांनी या ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.

मात्र, उद्यापर्यंत गतिरोधकाजवळ पथदीप, आवश्यक सूचना फलक तसेच रंगकाम पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी तूर्त माघार घेतली. उद्यापर्यंत आश्वासन पूर्ण न झाल्यास गुरुवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही दिला. सोमवारी रात्री गतिरोधकावर दुचाकी उसळून झालेल्या अपघातात निफा फर्नांडिस या तरुणीचा मृत्यू झाला होता.

यापूर्वी याच गतिरोधकामुळे अनेक अपघात झाले आहेत. हा गतिरोधक धोकादायक ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथे आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ वारंवार करत होते. परंतु, या मागणीकडे प्रशासनाने काणाडोळा केला होता. परिणामी येथे एका तरुणीचा बळी गेला. यामुळे संतापलेल्या लोकांनी सरपंच बालाजी गावस यांच्या नेतृत्वाखाली आज ‘रास्ता रोको’ करण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Rescued: घनदाट जंगलात गुहेत आढळली रशियन महिला! गोवामार्गे पोचली गोकर्ण येथे; कारण ऐकून पोलीस झाले थक्क

Goa Farmers: ऊस उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! प्रतिहेक्टर अर्थसाहाय्य योजना होणार बंद; यंदापासून प्रतिमेट्रीकनुसार भाव

Rashi Bhavishya 13 July 2025: आर्थिक व्यवहारात फायदा, नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल; जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य

Paliem: पूर्वजांनी नवदुर्गेचे नाव घेत, कष्टाने निर्माण केलेला पाचूचा 'पाळी' गाव

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

SCROLL FOR NEXT