Crime News  Dainik Gomantak
गोवा

Crime News : लोटलीत प्रेमप्रकरणातून युवकाला जबर मारहाण

युवकाला किरकोळ दुखापत असून याप्रकरणी मारहाण केलेल्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News : मडगाव लोटली येथे असलेल्या आरोग्य केंद्राजवळ प्रेमप्रकरणावरून बुधवारी रात्री पाच ते सहाजणांच्या गटाने रायसन फर्नांडिस या तरुणाला जबर मारहाण करण्याचा प्रकार घडला. सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक वाद झाला.

नंतर ही बाचाबाची वाढत जाऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. या नंतर ५ ते ६ युवकांच्या गटाने रायसनला मारहाण केली. युवकाला किरकोळ दुखापत असून याप्रकरणी मारहाण केलेल्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

लोटली-वानशे येथील आरोग्य केंद्राजवळ बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास हा प्रकार घडला होता. यावेळी काही युवकांकडून गळ टाकून मासेमारी सुरू होती.

तेव्हा गर्लफ्रेंडच्या नावावरून चिडवण्याचा प्रकार घडला, याच रागातून पाच ते सहा युवकांनी रायसनवर हल्ला केला. त्याला दांड्यासह जड वस्तूंनी मारहाण केली. यात रायसनच्या डोक्याला मार लागला व रक्तस्त्राव होऊ लागला.

मायणा-कुडतरी पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल झालेली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

जखमीला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केलेले आहे. पोलिसांकडून मारहाणप्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

हल्लेखोरांची ओळख पटवणे सुरू

तक्रारीत सात ते आठ जणांनी मिळून मारहाण केली. मात्र अजूनही मारहाण करणाऱ्यांची ओळख पटलेली नाही. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार जखमा मोठ्या नसल्याचे दिसते.

पाचपेक्षा जास्त युवकांकडून मारहाण घडली असल्यास तसा गुन्हा नोंदवण्यात येईल. अजूनही हल्लेखोरांची ओळख पटवणे सुरू आहे. पोलिस निरीक्षक अरुण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT