Goa Land Grabbing Cases:  Dainik Gomantak
गोवा

Goa Land Grabbing Cases: गेल्या साडेपाच वर्षात राज्यात जमिन हडपल्याप्रकरणी एकूण 76 गुन्हे दाखल

50 टक्के प्रकरणे 2022 मधील; तपासासाठी राज्य सरकारने स्थापन केलीय एसआयटी

Akshay Nirmale

Goa Land Grabbing Cases: गोवा पोलिसांनी गेल्या साडेपाच वर्षांत म्हणजेच 2018 पासून राज्यभरात जमीन बळकावण्याच्या तब्बल 76 गुन्ह्यांची नोंद केली आहे. दरम्यान, यातील 50 टक्के गुन्हे एकट्या 2022 या वर्षात दाखल झाले आहेत. राज्य सरकारने या गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केल्यानंतर ही 50 टक्के प्रकरणे नोंदवण्यात आली होती.

2018 मध्ये नोंदवलेल्या 50 जमीन हडप प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे, तर 2019 मध्ये नोंदवलेल्या सर्व प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे. तसेच 2020 आणि 2021 मध्ये नोंदवण्यात आलेल्या 50 टक्के प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे.

सध्या 2022 मधील जमीन हडप प्रकरणांपैकी 90 टक्के तर 2023 मध्ये नोंदवलेल्या सर्व शंभर टक्के प्रकरणांची चौकशी सुरू आहे. अलीकडेच, एसआयटीने म्हापसा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे यूकेच्या गृहसचिव सुएला ब्रेव्हरमन यांच्या आसगाव येथील वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.

पुर्वी आसगाव हे एक शांत गाव होते. पण आता अनेक रेस्टॉरंट्सनी ते गजबजले आहे. श्रीमंत पर्यटकांसाठी ते एक महत्वाचे डेस्टिनेशन बनले आहे. आसगाव उत्तर गोव्यातील सुप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे येथील प्रॉपर्टीचे दर वाढले आहेत.

पोर्तुगीज शैलीतील अनेक घरे येथे आहेत. एसआयटी जमीन हडप घोटाळ्याप्रकरणी सुमारे 100 मालमत्तांची चौकशी करत आहेत त्यातील 70 आसगावमध्ये आहेत. एसआयटीद्वारे चौकशी सुरू असलेल्या प्रकरणातील 90 टक्के प्रकरणे बार्देश मधीलच आहेत.

दरम्यान, राज्यातील जमीन हडप प्रकरणांची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. के. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय आयोगही स्थापन करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cutbona Jetty: कुटबण जेटीवर अस्वच्छतेचे साम्राज्य! आरोग्य खात्याच्या पाहणीत अनेक त्रुटी उघड; पाणीपुरवठ्या अभावी कामगारांचे हाल

म्हापसा नालेसफाईचा केवळ फार्स? पावसाळ्यापूर्वी प्रशासनाचा चालढकलपणा; नाल्यातील गाळ काठावरच ठेवल्यानं 'टुगेदर फॉर म्हापसा' संघटनेचा संताप

Goa Assembly Elections 2027: सासष्टीचा 'तो' बालेकिल्ला काँग्रेस पुन्हा जिंकणार? 2027 कडे सर्वांचे लक्ष; नुवे, बाणावली, कुडतरी आणि वेळ्ळी मतदारसंघांत पुन्हा एकदा चुरशीची लढत

Shocking News: रागाचा झटका बेतला जिवावर! स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून देवाला केला अर्पण; बायकोसोबतच्या वादातून 25 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Goa Human Trafficking: हरमल वेश्याव्यवसाय प्रकरणात दोन संशयितांना जामीन, ठोस पुराव्यांचा अभाव; पीडित महिलांनी साक्ष देण्यास दिला नकार

SCROLL FOR NEXT