Goa Police Accident Dainik Gomantak
गोवा

Accident in Goa : पेडण्यात भरधाव कारची क्रेनला धडक; चालकाचा जागीच मृत्यू

सुके कुळण परिसरात घडला अपघात

गोमन्तक डिजिटल टीम, दैनिक गोमन्तक

Goa Accident : गोव्यात अपघातांचं सत्र सुरुच असल्याचं चित्र आहे. पेडण्यात आज बुधवारी एका भरधाव कारची क्रेनला धडक बसली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

(A speeding car hit a crane in pernem the driver died on the spot)

महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या स्विफ्ट कारला पेडणे सुके कुळण परिसरात अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट क्रेनवर जाऊन आदळली. या अपघातात कारचालक रिकी बिनावथ याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील सहप्रवासी निधी गोडसे (27) आणि सुनील कराड (36) दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान दुसऱ्या एका अपघातात ट्रक कलंडल्याने काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला. गोव्याहून बेळगावला जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावरुन खाली घसरला. या अपघातामुळे काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मात्र आता ट्रक बाजूला काढल्याने वाहतूक सुरळित झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT