Church Dainik Gomantak
गोवा

G-20 प्रतिनिधींना घडणार ‘गोवा सफर’

सांस्कृतिक वारशाचे दर्शन : भारतीय पुरातत्त्व विभागाच्या गोवा परिमंडळच्या वतीने उपक्रम

गोमन्तक डिजिटल टीम

G-20 जी२०च्या चौथ्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीस येणाऱ्या निमंत्रित प्रतिनिधींसाठी भारतीय पुरातत्त्व विभागाचे गोवा परिमंडळ यांच्या वतीने एका विशेष सफर उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

गोव्यातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या जुने गोवे येथील तीन स्मारकस्थळे आणि पुरातत्त्व विभागाचे संग्रहालय या स्थळांना भेट देऊन या प्रदेशातील श्रीमंत सांस्कृतिक वारशाचा अनुभव २२ जूनच्या सफरीमधून जी२०च्या प्रतिनिधींना मिळणार आहे.

गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट या वारसास्थळाचे महत्त्व पाहून भारत सरकारने जी२० प्रतिनिधींच्या भेटीसाठी या स्थळाची निवड केली आहे.

वारसास्थळे व संग्रहालय भेटीचा एक भाग म्हणून जी२०चे हे प्रतिनिधी मंडळ जुने गोवे येथील बॅसिलिका ऑफ बॉम जिझस, सेंट कॅथ्रेडल, सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी चर्च, गोवा पुरातत्व संग्रहालय या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना भेट देणार आहे. प्रत्येकी ४५ प्रतिनिधींचा एक गट याप्रमाणे एक तीन गट या सफरीमध्ये सहभागी होणार आहेत.

G20 निमंत्रितांच्या प्रत्येक गटाची सफर सुमारे दोन तास चालणार असून एका वेळेस एकच गट एका स्थळास भेट देणार आहे.

यामुळे प्रत्येक प्रतिनिधीला या वारसास्थळांचे व्यवस्थित दर्शन घेऊन तेथील ऐतिहासिक तसेच वास्तुकलेचे महत्त्वही जाणून घेता येणार आहे.

- हेमसागर नाईक, पुरातत्त्वज्ञ, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण गोवा परिमंडळाचे अधीक्षक

जी२० बैठकांचे आयोजन करण्याबरोबरच जी२० निमंत्रित प्रतिनिधींना इतिहास, वारसा आण संस्कृतीबाबत गोव्याचे स्थान व महत्त्व किती अढळ आहे याची जाणीव करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

या भेटीच्या आयोजनासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेच्या गोवा परिमंडळाकडून मोठे सहकार्य मिळाले आहे.

- संजित रॉड्रिग्ज, G20 गोवाचे नोडल अधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT