गोवा चेंबर्सच्या अध्यक्षपदी श्रीनिवास धेंपे बिनविरोध

श्रीनिवास धेंपे हे 1 जुलै 2023रोजी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील.
Srinivas Dhempe
Srinivas DhempeDainik Gomantak
Published on
Updated on

Srinivas Dhempe गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या 2023-25 या कालावधीसाठीचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष राल्फ डिसोझा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर श्रीनिवास धेंपे हे 1 जुलै 2023 रोजी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील.

Srinivas Dhempe
Ponda News: शेती अवजारे, मातीची भांडी, गृहोपयोगी वस्तूंनी ‘कृषी महोत्सव’ गजबजला!

श्रीनिवास धेंपे हे गोवास्थित धेंपे ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष आहेत, ज्यांना कॅलक्लाइंड पेट्रोलियम कोक, जहाज बांधणी, अन्न प्रक्रिया, रिअल इस्टेट आणि वृत्तपत्र प्रकाशन यासारख्या उद्योगांमध्ये वैविध्यपूर्ण रूची आहे.

ते भारतीय उद्योग महासंघ या भारतातील सर्वात मोठ्या उद्योग लॉबीच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष राहिले आहेत. २०१३ मध्ये, धेंपे यांची गोवा येथे इटलीचे मानद व्हाईस कॉन्सुल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

त्यांची टाटा समूहाची कंपनी ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेडचे अध्यक्ष (स्वतंत्र संचालक) म्हणून नियुक्ती करण्यात आली. २५ मे २०२१ रोजी त्यांची किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते एआयएमए चे विद्यमान अध्यक्ष देखील आहेत.

Srinivas Dhempe
Panaji Municipality: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, गोंधळ, शाब्दिक वाद! महानगरपालिकेची सभा गाजली

योगायोगाने श्रीनिवास धेंपे हे त्यांचे आजोबा वसंतराव धेंपे (जानेवारी १९७३ ते डिसेंबर १९७६) आणि त्यांचे वडील वासुदेव धेंपे (जानेवारी १९८१ ते १९८४) ांच्यानंतरचे चेंबर्सचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले धेंपे परिवारातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी (ता.२०) धेंपे यांची गोवा चेंबरच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच गोव्याच्या आर्थिक विकासासाठी त्यांच्या अनुभवाचा नक्कीच लाभ होईल, असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com