Government of Goa Dainik Gomantak
गोवा

Government of Goa: मोरजीत अल्‍प प्रतिसाद; पंचच गैरहजर

जनजागृतीचा अभाव : पाऊण तासात गुंडाळला ‘प्रशासन तुमच्या दारी’ कार्यक्रम

गोमन्तक डिजिटल टीम

प्रशासन तुमच्या दारी’ या उपक्रमाला मोरजी पंचायत क्षेत्रातही अल्प प्रतिसाद मिळाला. याबाबत गावात जनजागृती झाली नसल्याचे निदर्शनास आले. हा कार्यक्रम सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत चालणार होता. परंतु अधिकारी साडेअकरानंतर आल्यानंतर केवळ अर्ध्या-पाऊण तासात तो गुंडाळण्‍यात आला.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे सचिव अजित रॉय, साबा परब (स्वयंपूर्ण मित्र), अधिकारी शेट्ये, सरपंच सुरेखा शेटगावकर, उपसरपंच पवन मोरजे, पंच मुकेश गडेकर, विलास मोरजे, फटू शेटगावकर, स्वप्निल शेटगावकर उपस्थित होते.

तर, पंच मंदार पोके, रजनी शिरोडकर व सुप्रिया पोके अनुपस्‍थित होत्‍या. मोजक्‍याच उपस्थित असलेल्‍या नागरिकांनी काही सार्वजनिक प्रश्न, समस्या मांडल्या.

धनंजय शेटगावकर, हनुमंत शेटगावकर, गजानन शेटगावकर, शिवनाथ शेट गावकर, निवृत्ती शिरोडकर यांनी विविध विषय मांडले. अजित रॉय यांनी समस्या ऐकून घेतल्या आणि त्‍या सोडविण्‍याचे आश्‍‍वासन दिले.

स्‍वयंसाहाय्‍य गटांना व्‍यासपीठ हवे

गावात सेल्फ हेल्प ग्रुप अनेक आहेत. त्यात महिला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, खाद्यपदार्थ तयार करत असतात. कापडी पिशव्याही बनवितात.

या पिशव्या जर पंचायत क्षेत्रातील सर्व दुकानदारांनी वापरल्‍या किंवा पंचायत मंडळाने प्लास्टिक हटाव मोहीम राबवली तर महिलांना पैसेही मिळतील आणि गावही ‘प्लास्टिकमुक्त’ होईल. शिवाय महिलांनी बनविलेल्‍या वस्‍तूंसाठी बाजारपेठ हवी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT