Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मद्यपी बसचालकाने प्रवाशांचा जीव घातला धोक्यात; म्हापसा-शिवोली मार्गावरील अंगावर काटा आणणारा थरार!

Dhuler to Mapusa BUS Route: चालकाने दारुच्या नशेत बस चालवत धुळेर-म्हापसापर्यंत दामटल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. 29) सकाळी उघडकीस आला.

Manish Jadhav

म्हापसा: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. यातच, चालकाने दारुच्या नशेत बस चालवत धुळेर-म्हापसापर्यंत दामटल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. 29) सकाळी उघडकीस आला. ही बस म्हापसा ते शिवोली मार्गावरील होती.

दरम्यान, याप्रकरणी एका प्रवाशाने हरकत घेत ताबडतोब पोलिस कंट्रोल रुमला फोन करुन याची माहिती दिली असता म्हापसा पोलिसांच्या रॉबर्ट गाडीने धुळेर-म्हापसा येथे सदर बस अडवली. त्यानंतर पोलिसांनी या बसचालकास पोलिस स्थानकावर आणले. या बसचालकांची पोलिसांनी येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात (Hospital) नेऊन अल्कोहोल चाचणी केली.

दुसरीकडे, म्हापसा (Mapusa) पोलिसांनी या बसचालकाला ताब्यात घेतले. सकाळची वेळ असल्याने या मिनी बसमध्ये बरेच प्रवासी होते. नंतर दुसऱ्या चालकाकडून या प्रवाशांना त्यांच्या निश्चित ठिकाणी सोडण्यात आले. अशा चालकांवर संबंधितांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांनी केली आहे.

दारुच्या नशेत गाडी चालवणाऱ्याला कोर्टाचा दणका

काही दिवसांपूर्वी, कळंगुट येथून अशाचप्रकारची घटना समोर आली होती. दारुच्या नशेत वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाला कोर्टाने दणका दिला होता. कोर्टाने वाहन चालकाला मोठा दंड ठोठावला होता. रेवानाथ मुसळे (रा. महाराष्ट्र) असे या वाहन चालकाचे नाव होते. तो दारुच्या नशेत वाहन चालवताना आढळून आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्याच्या रक्तात 102.8mg/100ml मद्य आढळून आले होते. म्हापसा न्यायालयाने चालकाला दोषी ठरवून त्याला 11,500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: भाजप–मगो युती 35 पेक्षा अधिक जागा जिंकेल! दामू नाईकांना ठाम विश्‍‍वास; सरकारमुळे मतदान वाढल्याचा केला दावा

Goa ZP Election Result 2025 Live Update: गोव्यात कोण बाजी मारणार? मतमोजणीला सुरुवात

Bardez: बार्देशात नेत्यांसमोर वर्चस्वाचे आव्हान, सस्पेन्स वाढला; ‘सायलंट’ मतदानामुळे अंदाज बांधणे कठीण

Ponda: फोंड्यात काही धक्कादायक निकालांचे संकेत, मातब्बर नेत्यांचे भवितव्य पणाला; 7 ही मतदारसंघात उत्सुकता शिगेला

Goa ZP Election: अनुक्रमांकाचा घोळ, ‘नोटा’चा अभाव; अनेकांच्‍या तक्रारी दाखल, मतदान पंचायतराज कायद्यानुसार घेतल्‍याचा आयोगाचा दावा

SCROLL FOR NEXT