Goa Crime: 2.23 कोटींच्या अफरातफरीप्रकरणी माजी व्यवस्थापकावर आरोपपत्र दाखल; SBI पणजी शाखेतील घटना

Panaji SBI Fraud Case: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) ट्रेझरी शाखेत २ कोटी २३ लाखांच्या घोटाळाप्रकरणी बँकेचा माजी व्यवस्थापक राकेश कुमार याच्याविरुद्ध पणजी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
Court
CourtX
Published on
Updated on

Panaji SBI Fraud Case Ex Manager Arrested

पणजी: येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) ट्रेझरी शाखेत २ कोटी २३ लाखांच्या घोटाळाप्रकरणी बँकेचा माजी व्यवस्थापक राकेश कुमार याच्याविरुद्ध पणजी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्याच्याविरुद्ध अफरातफर व भ्रष्टाचाराचा आरोप ठेवण्यात आला आहे, अशी माहिती क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर ठाकरे यांनी क्राईम ब्रँचकडे अफरातफर झाल्याची तक्रार क्राईम ब्रँचकडे २३ एप्रिल २०२४ रोजी दाखल केली होती. राकेश कुमार हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखेत व्यवस्थापक म्हणून कामाला होता. ८ मार्च २०१८ ते ६ जून २०२१ या काळात त्याने पदावर असताना बँक्स जनरल लेजर (बीजीएल) खात्यात अफरातफर करून त्यातील रक्कम स्वतःच्या डिमॅट खात्यामध्ये जमा केली होती व हे खाते आयआयएफएल सिक्युरिटीज लि. या मुंबईतील कंपनीशी संलग्न आहे.

त्यामुळे बँकेला सुमारे १ कोटी ८९ लाखांचा तोटा केल्याचे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीचा तपास क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी केला. कुमार याने पदाचा गैरवापर करत सुमारे २ कोटी २३ लाख ३२ हजार ५५ रुपयांची अफरातफर केल्याचे उघड झाले होते. त्याने ही रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर वळवून त्याचा गैरवापर केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com