Crime News Dainik Gomantak
गोवा

Tivim Crime: पैशांच्या वसुलीसाठी अभियंत्याचे अपहरण; कोलवाळ पोलिसांनी तिघा संशयितांच्या आवळल्या मुसक्या

Tivim Crime: थिवी येथे एका बांधकाम क्षेत्रातील अभियंत्याचे अपहरण करून त्यांची लुबाडणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Tivim Crime: थिवी येथे एका बांधकाम क्षेत्रातील अभियंत्याचे अपहरण करून त्यांची लुबाडणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी तिघा संशयितांना सावंतवाडी (महाराष्ट्र) येथून अटक करून त्यांनी अपहरणासाठी वापरलेली कारगाडी जप्त केली आहे. बलवीर सिंग गुर्जर (वय ३३), राजकुमार चौधरी (वय ३३, दोघेही रा. थिवी व मूळ राजस्थान) आणि विरेंदर कुमार (वय ५९, रा. थिवी व मूळ दिल्ली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. हा अपहरणाचा प्रकार रविवारी २८ एप्रिल रोजी संध्याकाळी ४.३० ते रात्री ९.३० या दरम्यान घडला.

दरम्यान, या प्रकरणी फिर्यादी हितेश जंगीड (रा. माडेल थिवी व मूळ राजस्थान) यांनी सोमवारी २९ एप्रिल रोजी सकाळी कोलवाळ पोलिसांत तक्रार दिली. संशयित बलवीर सिंग व राजकुमार यांचा टाईल्स फिटींगचा व्यवसाय असून विरेंदर कुमार हा त्यांच्याकडे कामाला होता. फिर्यादी हितेश जंगीड हे सिव्हिल इंजिनिअर असून ते राजस्थानमधीलच असल्याने त्यांची व्यवसायातून ओळख झाली होती. फिर्यादी हितेश जंगीड याने व्यवसायातील काही रक्कम संशयितांना द्यायची होती. ही रक्कम वसूल करण्याच्या हेतूने संशयितांनी फिर्यादी हितेश जंगीड यांना आपल्या कारमध्ये बसवले व त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडे पैसे मागितले.

नंतर एका निर्जनस्थळी असलेल्या खोलीमध्ये नेऊन तिथेही त्यांना मारहाण केली. फिर्यादी हितेश यांच्याकडे पैसे नसल्याचे पाहून संशयितांनी त्यांच्या हातातील अंगठी, खिशातील ५ हजार रुपये रोकड व मोबाईल फोन काढून घेऊन रात्री ९.३० च्या सुमारास त्यांना त्यांच्या दुचाकीकडे आणून सोडले.

कोलवाळ पोलिसांची कामगिरी

यासंबंधीची तक्रार दाखल होताच कोलवाळ पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. संशयित सावंतवाडी येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तिथे जाऊन तिन्ही संशयितांना कारसह ताब्यात घेतले व पोलिस स्थानकात आणून रीतसर अटक केली. संशयितांविरुद्ध अपहरण व लुबाडणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT