Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्ल्यू फ्लॅग मानांकना’ची अट

Goa Tourism: ‘हरित पर्यटन’साठी जागतिक बॅंकेचा आराखडा : राज्यात मानांकनप्राप्त किनारा नाही

दैनिक गोमन्तक

Goa Tourism:

जागतिक बॅंकेने राज्यामध्ये हरित पर्यटन राबवण्यासाठी तयार केलेल्या आराखड्यात राज्यात ब्ल्यू फ्लॅग मानांकन असणारे किनारे असावेत, अशी घातलेली अट सरकारसाठी त्रासदायक ठरू शकते. राज्यात अद्याप एकाही किनाऱ्याला सरकार ‘ब्ल्यू फ्लॅग मानांकन’ मिळवू शकलेले नाही.

जागतिक बँकेने हरित पर्यटनाचा आराखडा तयार करताना अनेक गोष्टी डोळ्यांसमोर ठेवल्या आहेत. यानुसार पर्यटन क्षेत्रामध्ये असलेल्या हॉटेल्सनी नवीनतम ऊर्जेचाच वापर केला पाहिजे, असा आग्रह धरण्यात आला आहे. पर्यटकांची वाहतूक करण्यासाठी हरित इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा वापर करावा, अशी सूचनाही या आराखड्यात करण्यात आली आहे. सौरऊर्जा निर्मिती आणि सौरऊर्जेचा वापर यावर यात भर देण्यात आला आहे.

याशिवाय उपहारगृहांत अन्न शिजवण्यासाठी हरित इंधन वापरावे तसेच परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रचलित नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, कचरा व्यवस्थापन सुयोग्य असावे अशा काही सूचनांचाही या आराखड्यात अंतर्भाव करण्यात आला आहे.

मात्र, या आराखड्यात सर्वात आधी राज्यात ‘ब्ल्यू फ्लॅग मानांकन’ असणारे समुद्रकिनारे हवेत, असे सुचवण्यात आले आहे. त्यापासूनच आराखड्याच्या अंमलबजावणीची सुरवात होणार असल्याने गेली पाच वर्षे या आघाडीवर यश न मिळवलेल्या राज्य सरकारला आता यासाठी गतीने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसते.

सरकारचे प्रयत्न अपुरे!

राज्य सरकारने या मानांकनासाठी मिरामार किनाऱ्याची निवड केली होती. मात्र, त्यासंदर्भात जारी करण्यात आलेली अधिसूचना न्यायालयात टिकू न शकल्याने सरकारचे प्रयत्न वाया गेले. त्यानंतर दक्षिण व उत्तर गोव्यातील काही किनाऱ्यांची नावे पुढे करण्यात आली. मात्र, त्यादृष्टीने सरकारकडून पुढे काहीच पावले टाकण्यात आली नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

SCROLL FOR NEXT