Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: स्मार्ट सिटीच्या कामावर प्रश्‍नचिन्ह

Panjim Smart City: करंझाळेत पुन्हा कलंडला टँकर : चेंबरमध्ये रुतले चाक; शहरात सातव्यांदा घटना

दैनिक गोमन्तक

Panjim Smart City: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजी शहरात वेगाने विकासकामे सुरू आहेत. शनिवारी सायंकाळी टोंक-करंझाळे येथे मैलावाहू टँकरचे ( जीए-०३-डब्ल्यू-१११३) मागील चाक चेंबरमध्ये अडकले आणि टँकर जागीच कलंडला. त्यामुळे मलनिस्सारणाच्या चेंबरच्या कामावर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

स्मार्ट सिटीअंतर्गत करंझाळे येथील मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प ते इंटरनॅशनल हॉटेलपर्यंतचा (मिरामार) रस्ता रुंद केला आहे. त्याचे सुशोभीकरणाचे काम बाकी आहे. काही महिन्यांपूर्वीच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला होता.

सिमेंट रस्त्याच्या बाजूला पदपथाशेजारी वाहन पार्किंगच्या जागी पेव्हर्स टाकले आहेत. याच पेव्हर्सच्या खाली मलनिस्सारणाचे चेंबर आहेत. या पेव्हर्सवरून जाताना मैलावाहू टँकरचे मागील चाक रुतले. त्याचवेळी टँकरचा वेग वाढविल्याने चेंबरवरील पेव्हर्स बाजूला सरकून चाक खाली गेले आणि टँकर कलंडला. यात चालक वा क्लिनरला इजा झाली नाही. मात्र, स्मार्ट सिटीच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

शहरात यापूर्वी जी कामे सुरू आहेत, त्यामुळे पणजीकर त्रस्त आहेत. सांतिनेजमधील खोदकामाचा दररोज ताळगावमधून ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी जी कामे झाली, त्यांच्या दर्जाविषयी संशय व्यक्त केला जात होता.

चेंबर खोदकाम सुरू झाल्यानंतर शहरात किमान सहा ते सात वेळा टँकर आणि अवजड वाहने कलंडण्याचे प्रकार घडले आहेत.

विरोधकांना कोलीत

स्मार्ट सिटीच्या कामाचा विषय यापूर्वी विधानसभेतही गाजला आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी या कामाविषयी सतत आवाज उठवला होता. आता रस्त्याचे काम होऊनही जर अवजड वाहनांमुळे चेंबर खचत असेल तर कामाच्या दर्जाचा प्रश्‍न उपस्थित होणारच आहे. उत्पल पर्रीकर यांनीही शहरात पाहणी करून पुन्हा एकदा खोदकामावर प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT