Drama  Dainik Gomantak
गोवा

तियात्र सादरीकरणासाठी आता ‘हा’ दाखला सक्तीचा; कलाकार, आयोजक सापडले अडचणीत

स्‍थानिक तियात्र कलाकारांनी व्‍यक्‍त केली नाराजी

दैनिक गोमन्तक डिजिटल

'Noise Pollution' certificate Mandatory For tiatrs गावागावात होणाऱ्या फेस्‍तांवेळी खुल्‍या मंडपात सादर केले जाणारे तियात्र हा गोव्याच्या संस्‍कृतीचा अविभाज्‍य भाग असला तरी आता असे तियात्र सादर करण्‍यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘ध्‍वनी प्रदूषण’ ‘ना हरकत’ दाखला घेणे अनिवार्य केल्‍याने आयोजक अडचणीत आले आहेत.

हा दाखला मिळविण्‍यासाठी आयोजकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या साळगाव येथील कार्यालयात खेटा घालाव्‍या लागत आहेत.

यामुळे स्‍थानिक तियात्र कलाकारांनी नाराजी व्‍यक्‍त केली असून तियात्रांमुळे असे कोणते ध्‍वनी प्रदूषण होते, त्यासाठी या दाखल्‍याची गरज वाटावी, असा सवाल त्‍यांनी केला आहे. यापूर्वी खुल्‍या मंडपात होणाऱ्या काजारांसाठीही असा दाखला घ्‍यावा लागत होता.

उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार खुल्‍या जागेत आयोजीत केल्‍या जाणार्‍या सर्व कार्यक्रमांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘ना हरकत’ दाखला सक्तीचा केला आहे. त्‍यात एका वटहुकूमाद्वारे शिथिलता आणावी, अशी मागणी स्‍थानिक करत आहेत.

"दक्षिण गोव्‍यातील तियात्र हे सरकार बंद पाडू पाहते आहे. प्रत्‍येक तियात्र करण्‍यासाठी अशी परवानगी घ्‍यावी लागल्‍यास आणि ती घेण्‍यासाठी साळगावला जावे लागल्‍यास कुणी गावात तियात्रच करणार नाहीत, अशी भीती आहे. सरकारने याची दखल घेऊन ही सक्‍ती रद्द करावी."

- वेन्‍झी विएगस, ‘आमदार बाणावली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT