Tourism Minister Rohan Khaunte  Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte: नवीन शॅक पॉलिसी मे अखेरपर्यंत शक्य नाही; पर्यटन मंत्र्यांचे स्पष्टीकरण

Akshay Nirmale

Rohan Khaunte On New Shack Policy: समुद्रकिनाऱ्यांवर शॅक चालवणाऱ्यांना बीच शॅक पॉलिसी मेअखेरपर्यंत तयार करायची आहे, पण शक्यतो तसे होणार नाही. आगामी एप्रिल आणि मे या दोन महिन्यात ही पॉलिसी तयार होणे सोपे नाही, असे स्पष्टीकरण पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिले.

दरम्यान, हे धोरण आम्हाला लवकरात लवकर तयार करायचे आहे, असेही पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन धोरणाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी शॅकशी संबंधित सर्व घटकांसोबत किमान काही चर्चा करणे आवश्यक आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी नवीन धोरणात काही सुधारणा करण्याचे संकेत दिले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही आवश्यक असलेले कठोर बदल स्विकारणे जड जाऊ शकते, पण त्यातील काहींची गरज आहे.

गेल्या 10 वर्षांत, बीच शॅक धोरणात कोणतेही मोठे बदल झाले नाहीत. शेवटचा मोठा बदल 2012 मध्ये करण्यात आला. तेव्हा बीच शॅक परवान्याची मुदत एक वर्षावरून तीन वर्षे केली होती. विस्तारित बीच शॅक धोरणाची मुदत 31 मे रोजी संपेल.

जोपर्यंत बीच शॅक धोरणाचा मसुदा तयार केला जात नाही आणि मंत्रिमंडळाची मान्यता मिळत नाही तोपर्यंत शॅक्सचे नवीन वाटप शक्य होणार नाही.

आम्ही तीन वर्षांची मुदत ठेवू शकतो, मुदत वाढवल्यास शॅक ऑपरेटर आनंदी होतील. मात्र, मुदत वाढवणे हा मोठा निर्णय असेल. पण, सरकार त्यासाठी राजी असेल, असे वाटत नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटी (SOWS) ने येत्या दोन महिन्यांत धोरण तयार करण्याबाबत सरकारला पत्र लिहिले आहे. दरम्यान, निवडक समुद्रकिनाऱ्यांवर मॉडेल शॅक्स लावण्याच्या पर्यटन विभागाच्या प्रस्तावावर काही ठिकाणी आवाज उठवला जात आहे. या मुद्यावर आधीच चर्चा झाली पाहिजे, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT