Curchorem: कुडचडे बाजारपेठेतील रस्त्यात रूतला ट्रक; तासभर वाहतूक कोंडी

वाहनधारकांना मनस्ताप
Curchorem Truck Struck in Road
Curchorem Truck Struck in Road Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Curchorem: राजधानी पणजीमध्ये स्मार्ट सिटीच्या कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. या कामांमुळे शहरात सहा वेळा ट्रक रस्त्यात रूतून वाहतूक कोंडीचे प्रकार घडले आहेत. असाच प्रकार आता दक्षिण गोव्यातील कुडचडे येथे झाला आहे.

Curchorem Truck Struck in Road
Goa Child Pregnancies: धक्कादायक! गोव्यात अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेत वाढ; महिन्याला 'इतकी' प्रकरणे उघड

कुडचडे येथे रस्त्याची तसेच ड्रेनेजची कामे सुरू आहेत. येथील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर सकाळी साडे सहाच्या सुमारास एक मालवाहू ट्रक बुधवारी सकाळी अचानक रूतला. नगरपालिकेच्या इमारतीजवळच ट्रक रूतल्याने येथील वाहतूक त्याचा परिणाम झाला.

सकाळी फारशी रहदारी नसली तरी ट्रक काढण्यासाठी खूप कसरत करावी लागली. सुमारे तासभर हा ट्रक बाहेर काढण्याचा प्रस्ताव केला जात होता. त्यामुळे सुमारे तासभर येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. येथे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Elevated Road
Porvorim Elevated Road Traffic Management
Porvorim elevated road 600 crore project
Curchorem Drug Capital Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com