Suryakant Gaonkar Dainik Gomantak
गोवा

Nature Lover: नैसर्गिक ‘संजीवनी रंग’ बनविणारा अवलिया

भुईपाल-सत्तरीत किमया : आरोग्यदायी; शिगमोत्सवात लोकांसाठी ठरेल वरदान

गोमन्तक डिजिटल टीम

पद्माकर केळकर

आपण जे केमिकलयुक्त रंग वापरतो ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. पण जर आपण नैसर्गिक रंग वापरले तर ते मानवाला फायद्याचे ठरणारे आहेत. भुईपाल-सत्तरी येथे असाच एक अवलिया आहे, जो गेली बरीच वर्षे जंगलातील फळे, भाज्या, पालेभाज्या, हळद, मका बिया यांपासून नैसर्गिकरीत्या विविध रंग तयार करीत आहे.

भुईपाल गावचे सूर्यकांत गावकर हे निसर्गप्रेमी असून निसर्गाप्रती असलेल्या ओढीने त्यांनी नैसर्गिक रंग बनविण्याचे कार्य सुरूच ठेवले आहे. यंदाचा होळी सण मार्च महिन्यात आला असून त्याकरिता लागणारे रंग बनविण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांनी या रंगांना ‘संजीवनी रंग’ असे नाव ठेवले आहे.

होळी, शिगमोत्सवात बाजारात उपलब्ध रंगांना मोठी मागणी असते. ६ मार्चपासून सत्तरीतील शिमगोत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी लोकांनी तयारी सुरू केली आहे.

सूर्यकांत यांना जंगलात फिरण्याची प्रचंड आवड आहे. अशा काळात मिळालेले प्रभावी मित्र (गुरू) राजेंद्र केरकर यांमुळे त्यांना चांगली दिशा मिळाली आहे.

हिरवा, पिवळा, निळा, केसरी असे चार रंग तयार करीत आहे. सुरवातीच्या काळात तांबडीसुर्ला, विर्डी या भागात जंगलात फिरून केशरी फळे गोळा करायचो. जंगली झाडांचा मानवाला उपयोग आहे. त्यासाठी योग्य वापर करून अशा कार्यातून दुर्मीळ झाडे संवर्धित होण्यासाठी मदत झाली आहे. जी झाडे वापरात नाहीत; पण त्यांचा कसा उपयोग होऊ शकतो हे दाखविण्याचा प्रयत्न आहे.

- सूर्यकांत गावकर, निसर्गप्रेमी

केशरी बिया उपयुक्त

सूर्यकांत गावकर म्हणाले, आपण जंगल सफर करायचो. त्यावेळी नैसर्गिक झाडांची भेट होऊन ओढ निर्माण झाली. त्यावेळी जंगली फळे, बिया यांमध्ये रंग शोधत होतो. नदीकाठच्या बाजूला असलेल्या केशरी झाडांच्या बिया रंगासाठी फार उपयुक्त आहेत. तसेच सरबत करण्यासाठी केशरी बिया वापरायला मिळतात.

चव वाढण्यास मदत:-

होळीसाठी रंग बनविण्यासाठी केशरी बिया, हळद, मका बिया, पालक भाजी, गाजर, निळी झाडे अशांचा वापर केला जातो. जे शरीराला अपायकारक नसतात. केशरी बियांच्या पावडरचा वापर रंगाबरोबरच सरबत, फूड रेसिपीत म्हणजेच साखरभात करताना, रंगीत साधा भात करताना होतो. सरबत करताना ही पावडर वापरल्यास लिंबाचा रस आणखीनच चवदार होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT