Mauvin Godinho: गोव्यात विमानतळावर बहुमजली पार्किंग, एअरपोर्ट ते वेर्णा फ्लायओव्हर आणि मॉडर्न बसस्थानके...

गोव्याच्या वाहतूक मंत्र्यांनी सांगितला प्लॅन, सोमवारी नितीन गडकरींना भेटणार
Transport Minister Mauvin Godinho
Transport Minister Mauvin Godinho Dainik Gomantak
Published on
Updated on

Mauvin Godinho: गोव्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी आगामी काळात गोव्यातील वाहतुकीच्या सुविधांसंदर्भातील विविध योजनांबाबत माहिती दिली. यातून नागरिकांसह पर्यटकांची सोय पाहिली जात आहे. यामध्ये विमानतळपासून ते बस स्थानकांपर्यंतच्या योजनांचा समावेश आहे.

Transport Minister Mauvin Godinho
Japanese Tourist Fraud Case: जपानी पर्यटकाला लुबाडणाऱ्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना 50 हजाराचे बक्षिस

मंत्री गुदिन्हो म्हणाले की, गोवा विमानतळांवर वाहनधारकांच्या सोयीसाठी बहुमजली पार्किंग करणे गरजेचे आहे. बहुमजली पार्किंगमुळे वाहनांची सोय होईल. आम्ही एक फ्लायओव्हर बांधत आहोत. गोवा विमानतळावरील ग्रेड सेपरेटर पासून ते वेर्णा जंक्शनपर्यंत हा फ्लायओव्हर असणार आहे.

याचा खर्च सुमारे 650 कोटी रूपये इतका असेल. त्यासाठी येत्या सोमवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहोत. याशिवाय राज्यात आणखी जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्या जाणार आहेत. तसेच सर्व बसस्थानकांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com