Panaji Dainik Gomantak
गोवा

Fire Brigade : अग्निशमनचे ‘मल्टिटास्क युनिट’; रायकर यांची माहिती

Fire Brigade : उपकरणे उपलब्ध; प्रत्येक स्थानकावर ५० कर्मचारी

गोमन्तक डिजिटल टीम

Fire Brigade :

पणजी, पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळ्यातील समस्यांना आपत्कालीनवेळी सामोरे जाण्यासाठी अग्निशमन दलाने तयारी केली असून ‘मल्टिटास्क युनिट’ स्थापन केले आहे. प्रत्येक स्थानकावर आवश्‍यक ती उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत.

पूर, आग व अपघात यासारख्या घटना तत्परतेने सोडवण्यासाठी अत्याधुनिक उपकरणेही राखीव ठेवण्यात आली आहेत.

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनासंदर्भात बैठक घेतल्यानंतर अग्निशमन दलाने येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. राज्यात असलेल्या अग्निशमन दलाच्या १७ स्थानकांवर कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यात आली आहे व सरासरी प्रत्येकी ५० कर्मचारी आहेत. त्यामध्ये स्थानक प्रमुख व २ उपअधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पावसाळ्यात आलेले कॉल्स प्रमाणापेक्षा अधिक असल्यास ते जवळच्या स्थानकाला देऊन त्यांची सेवा घेतली जाणार आहे. अत्याधुनिक उपकरणे तसेच प्रत्येकी २ पाण्याचे बंब तैनात ठेवले जातील.

पावसाळ्यात झाडे पडण्याच्या घटना अधिक असतात, त्यामुळे प्रत्येक स्थानकाला इलेक्ट्रिकल चेन कटर्स, पेट्रोल कटर्स तसेच हायड्रोलिक टूल्स देण्यात आले आहेत. घटनेच्या ठिकाणी उजेडासाठी आस्का लाईट्स तसेच ग्रामीण भागात ‘लाईटिंग सिस्टीम’, पोर्टेबल टॉर्च, लाईट मास्टचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती दलाचे संचालक नितीन रायकर यांनी दिली.

१७८ कोटींची मालमत्ता वाचविली

गेल्या आर्थिक वर्षात (एप्रिल २३ ते मार्च २४) या काळात आगीचे तसेच बिगर आगीचे मिळून ८,०८२ कॉल्स नोंद झाले होते. त्यामध्ये ३,१३६ कॉल्स आगीचे होते. आगीच्या दुर्घटनेत ५ मनुष्यांचा जीव वाचविला होता तसेच १७८ कोटींची मालमत्ता वाचवण्यात यश आले होते.

गेल्या चार महिन्यांत (१ जानेवारी ते ३० एप्रिल २०२४) राज्यातून अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला २,४३८ कॉल्स आले, त्यापैकी १,५७३ कॉल्स आगीचे होते. या आगीत ३.३५ कोटींचे नुकसान झाले तर १९.७९ कोटींची मालमत्ता वाचवण्यात आली.

यावर्षी गेल्या चार महिन्यांत नोंद झालेल्या १,५७३ आगीच्या कॉल्सपैकी ९ घटना मोठ्या होत्या. यामध्ये बहुतेक घरांना व फ्लॅट्समध्ये लागलेल्या आगीतून १.५ लाख ते १० लाखांपर्यंतची मालमत्ता दलाच्या जवानांनी वाचविली आहे.

कुंडईतील औद्योगिक वसाहतीमधील मे. गोवा इन्व्हेस्टकास्ट फॅक्टरीला आगीवेळी ६.४९ कोटींची तर मे. सावनाह सर्फाक्टानॅट्स लि. कंपनीची आगीवेळी ९.९८ कोटींची मालमत्ता वाचवण्यात आल्याची माहिती रायकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubhanshu Shukla: अंतराळवीर 'शुभांशू शुक्ला' पृथ्वीवर परतणार! हार्मनी मोड्यूलमधून प्रवास होणार सुरु

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Valpoi: देवाक काळजी रे! गवाणे-सत्तरीतील कुटुंबाला मिळणार निवारा; आरोग्यमंत्री राणे बांधून देणार घर

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT