MLA Venzi Viegas Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सिक्‍वेरांना मंत्रिपद म्‍हणजे फुटीला उत्तेजन; आमदार वेन्‍झी व्‍हिएगस

दैनिक गोमन्तक

Goa Politics: कुणाला मंत्री करावे आणि कुणाला मंत्रिपदावरून काढावे, हा जरी भाजपचा अंतर्गत प्रश्‍न असला तरी नुवेचे आमदार आलेक्‍स सिक्‍वेरा यांना मंत्रिपद देणे म्‍हणजे, भाजपाकडून फुटीरतेला उत्तेजन देण्‍यासारखे आहे आणि ही गोष्‍ट लोकशाही व्यवस्थेला मारक आहे, असे मत बाणावलीचे आप आमदार वेन्‍झी व्‍हिएगस यांनी व्‍यक्‍त केले.

व्‍हिएगस म्‍हणाले, काँग्रेसमधून जे आठ आमदार फुटून भाजपामध्‍ये सामील झाले, त्‍यांच्‍या विरोधात अपात्रता याचिका प्रलंबित आहे. हा प्रश्‍न न्‍यायालयातही गेला आहे. अशा परिस्‍थितीत फुटून आलेल्‍यांना मंत्रिपद देणे म्‍हणजे लोकशाहीचा अपमान करणे असे असून या लोकसभा निवडणुकीत मतदार या लोकशाही विरोधी पक्षाला योग्‍य तो धडा शिकवेल असे ते म्‍हणाले.

व्‍हिएगस म्‍हणाले, सिक्‍वेरा यांना मंत्रिपद देणार असे आश्वासन दिले होते त्‍या आश्वासनाची पूर्ती आता केली गेली आहे असे मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. मुख्‍यमंत्री अशी राजकीय आश्वासने पाळत असले तरी विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षाच्‍या आमदारांना जी आश्‍वासने दिली आहेत, ती ते पाळू शकत नाहीत.

ही राजकीय आश्‍वासने पाळण्‍यापेक्षा जर आमदारांना दिलेली आश्‍वासने पाळली असती तर गोव्‍याचे नक्‍कीच भले झाले असते. काब्राल यांची आता काही गरज नाही, हे समजल्‍यामुळेच त्‍यांच्‍या हाती नारळ देण्‍यात आला आहे. तो लवकरच आणखी काही मंत्र्यांना येईल, अशीही प्रतिक्रिया अमीत पालेकर यांनी व्‍यक्‍त केली.

भाजप म्‍हणजे ‘यूज ॲण्‍ड थ्रो’

‘यूज ॲण्‍ड थ्रो’ ही भाजपाची नेहमीचीच पद्धती आहे. कुठलीही व्‍यक्‍ती जोपर्यंत आपल्‍या कामाची तोपर्यंत त्‍याचा वापर करायचा आणि नंतर त्‍याला फेकून द्यायचे ही भाजपाची पद्धती कळून चुकल्‍यामुळेच आमच्‍यासारखे कित्‍येक मूळ भाजप कार्यकर्ते भाजपची साथ सोडून दुसरीकडे गेले आहेत, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे गोवा अध्‍यक्ष अमीत पालेकर यांनी व्‍यक्‍त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT