Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco : अमली पदार्थ प्रकरणात बायना येथील एकाला अटक; कदंब बस स्थानकावर केली कारवाई

अडीच लाखाचे अमली पदार्थ जप्त

दैनिक गोमंतक

गोवा पोलिसांनी अमली पदार्थ प्रकरणात धरपकड सुरुच ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर आज वास्को येथील कदंब बस स्थानकावर छापा टाकत एकाला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 2.3 किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे.

(A man from Baina has been arrested in a drug case at Kadamba bus station in Vasco)

मिळालेल्या माहितीनुसार आज वास्को येथील कदंब बस स्थानकावर अमली पदार्थ प्रकरणात कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी बायना येथील मौनूद्दीन नवाज शेख वय 25 याला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी संशयिताकडून अडीच लाखा रुपये किंमतीचा 2.3 किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कदंब बस स्थानकावर एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत संशयित मौनूद्दीन नवाज शेख याला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का? याचा तपास सुरु असून शेख याला अमली पदार्थ पुरवठा झाला कसा याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान पीर्णा-बार्देश येथील शापोरा नदीत बेकायदा रेती उत्खनन करणार्‍या दोन मजुर कामगारांना अटक करीत होडी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात कोलवाळ पोलिसांनी मामलेदार व खाण खात्याच्या अधिकार्‍यांसमवेत कारवाई केली. ही कारवाई दि. 13 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

Goa Cyber Fraud Cases: गोव्यात सायबर फसवणुकीचे वाढते जाळे; ऑनलाईन व्यवहारांत नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा, पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

Bharatiya Nyaya Sanhita Cases: सुमारे 78% प्रकरणांत आरोपपत्रे दाखल; 'बीएनएस' अंतर्गत गेल्‍या दोन वर्षांत 4,459 गुन्‍ह्यांची नोंद

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT