Goa Tourism: गोव्याचे पर्यटन म्हणजे फक्त किनारे, सीफूड नव्हे तर...

राज्यात सांस्कृतिक,धार्मिक, आध्यात्मिक पर्यटनालाही वाव आहे. -रोहन खंवटे
Rohan Khaunte |Goa News
Rohan Khaunte |Goa NewsDainik Gomantak

Goa Tourism: गोव्यातील महत्त्वाची पर्यटन केंद्रे म्हणजे केवळ येथील समुद्रकिनारे आणि सी-फूडच नसून त्यापलिकडेही ग्रामीण भागात वसलेला धार्मिक, सांस्कृतिक तसेच अध्यात्मिक स्वरुपातील खराखुरा गोवा पर्यटन नकाशावर आहे. राज्यातील पर्यटनाची व्याप्ती वाढविण्याचा आपल्या खात्याचा मनसुबा आहे,असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी बार्देशातील आग्वाद येथे सांगितले.

सोमवारी, आग्वाद येथे आयोजित कार्यक्रमात एअर बीएनबी आणि गोवा पर्यटन खाते यांच्यात सामंजस्य करार संमत झाला. यावेळी, भारत, दक्षिणपूर्व आशिया, भारत आणि तैवानचे महाव्यवस्थापक, अमनप्रीत बजाज, प्रसीता मेनॉन, तसेच मीक डोह उपस्थित होते.

शाश्‍वत पर्यटनाला चालना देणार : आज संमत झालेल्या सामंजस्य करारानुसार जगभरात सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून चालना देण्यासाठी एअर बीएनबी आणि गोवा पर्यटन खात्याकडून एकत्रित प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामीण भागातील अपरिचित पर्यटन स्थळे, ‘होम स्टे’ आदींसाठी प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा, आदींच्या माध्यमातून हा सामंजस्य करार यशस्वी करण्याचा प्रयत्न राहील, असे खंवटे यांनी सांगितले.

Rohan Khaunte |Goa News
Goa: वेश्‍याव्यवसायाचा ‘हरमल’ला विळखा!

पर्यटन विभाग, गोवा सरकार आणि एअर बीएनबी एकत्रित प्रयत्नांतून गोव्याला उच्च दर्जाचे पर्यटनस्थळ बनविण्याचे प्रयत्न करतील. प्रवाशांना नवा अनुभव देण्यासाठी किनारपट्टी वगळता अंतर्गत भागात पर्यटन आणि ‘होम स्टे’वर भर दिला जाणार आहे. यासाठी देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पर्यटन स्थळांच्या जाहिरात मोहिमा राबविल्या जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com