Leopard Dainik Gomantak
गोवा

Leopard In Goa: वनखात्याच्या सापळ्यात बिबट्या अडकला; सुरबानवाडा-चोपडे येथील घटना

Chopdem: बिबटा नर जातीचा असून तो सुमारे तीन वर्षांचा आहे; दोन दिवस बिबट्याने लावलेल्या सापळ्याला दाद दिली न्हवती

गोमन्तक डिजिटल टीम

सुरबानवाडावाडा-चोपडे येथे बुधवारी पहाटे पेडणे वनखात्याने लावलेल्या सापळ्यात बिबटा अडकला. हा बिबटा नर जातीचा असून तो सुमारे तीन वर्षांचा आहे.

सुरबानवाडावाडा-चोपडे भागात रोज गावठी पाळीव कुत्र्यांना व गुरांना बिबट्या खातो, अशा स्थानिकांच्या तक्रारी होत्या. त्यानुसार पेडणे वन खात्याने मागच्या रविवारी रात्रीपासून सापळा लावला होता. या पिंजऱ्याच्या एका बाजूने बिबट्याला आमिष म्हणून कुत्रा ठेवण्यात आला. गेले दोन दिवस बिबट्याने वन खात्याने लावलेल्या या सापळ्याला दाद दिली नाही.

मात्र, बुधवारी पहाटे हा बिबटा या पिंजऱ्यात शिरला व अडकला. नंतर पेडणे वन कार्यालयाचे अधिकारी जॉन फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक अधिकारी हरीश महाले, राउंड फॉरेस्टर अनिल केरकर, अविनाश परब, जितेंद्र नाईक, स्नेहल साळगावकर, अर्जुन शेटगावकर यांनी बिबट्याला पिंजऱ्यासह रस्त्यावर उचलून आणले व वन कार्यालयाच्या जागेत ठेवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT