Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: फार्मागुडी येथे टँकरच्या धडकेत कोल्हापुरचा युवक ठार

कारला ओव्हरटेक करताना टँकरची धडक

Akshay Nirmale

Death By Accident in Phonda Goa : फोंडा तालुक्यातील फार्मागुडी येथे आज सकाळी झालेल्या विचित्र अपघातात कोल्हापुरच्या दुचारीस्वाराचा मृत्यू झाला. सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. संदीप प्रभाकर असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

संदीप प्रभाकर हा सध्या आमराई कॉलनी, कुर्टी येथे राहत होता. तर तो मूळचा कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील आहे. तो गोव्यातील खासगी कंपनीत 2013 पासून काम करत होता.

हा अपघात घडला तेव्हा रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. फार्मागुडी येथून संदीप प्रभाकर हा पणजीच्या दिशेने येत होता. यावेळी त्याने पणजीच्याच दिशेने जात असलेल्या एका वॅगनआर कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक पाठीमागून दिली.

त्यामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्यात पडला. नेमका त्याचवेळी विरूद्ध दिशेने येत असलेल्या टँकरने त्याला धडक दिली. हा टँकर फोंड्याच्या दिशेने जात होता. या धडकेमुळे दुचाकीस्वार संतोष प्रभाकर याचा जागीच मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT