गोव्यातील 'त्या' गावात सुरु होती काळा जादू?. रशियन पर्यटक म्हणतात, 'आम्ही तर...

स्थानिकांच्या विरोधानंतर झाली होती बाचाबाची
Black Magic in Goa | Russian Citizen
Black Magic in Goa | Russian Citizen Dainik Gomantak

Black Magic in Goa: भोमवाडा- पालये येथे काही दिवसांपुर्वी रशियन नागरिक ब्लॅक मॅजिक करत असल्याचे समोर आले होते. त्यावरून तणाव निर्माण झाला होता. तसेच स्थानिकांनी रशियन नागरिकांना जाब विचारत त्यांचा कार्यक्रम बंद पाडला होता.

ता त्या परफॉर्मन्सबाबत संबंधित रशियन नागरिकांना स्पष्टीकरण दिले आहे. आमचा परफॉर्मन्स म्हणजे ब्लॅक मॅजिक नव्हता, असे रशियन नागरिकांनी म्हटले आहे.

Black Magic in Goa | Russian Citizen
Goa Beach: गोव्यात समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षणासाठी आता AI, रोबोटचा वापर

आमचे त्यादिवशीचे सादरीकरण काळी जादू असल्याची अफवा पसरली. पण तो परफॉर्मन्स भारतीय पुराणातील राजा विक्रमादित्यावर आधारीत होता. राजा विक्रमादित्याची शनिदेवाने घेतलेली सत्वपरीक्षा यावर आधारीत हा भाग होता.

यातील शनिची भुमिका साकारणाऱ्या व्यक्तीने काळ्या आणि नेव्ही ब्ल्यू रंगाचे कपडे परिधान केले होते. त्यातून लोकांचा गैरसमज झाला. पण या प्रकारामुळे आम्हाला दुःख झाले. भारतीय संस्कृती समजावून घेण्याच्या प्रयत्नाचा तो एक भाग होता. पंचायतीला देखील ही माहिती दिली आहे, असे या रशियन नागरिकांनी म्हटले आहे.

गोवा हे भारतातीलच नव्हे तर जगातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे देशासह जगभरातील पर्यटक गोव्यात येत असतात. यातील काही पर्यटकांच्या वर्तणुकीने गोव्याचे नाव बदनाम होत आहे. भोमवाडा- पालये येथे ब्लॅक मॅजिकचा सराव काही रशियन पर्यटक करत असल्याचे समोर आले होते.

Black Magic in Goa | Russian Citizen
Turkey Earthquake: तुर्कीत पुन्हा 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; मृतांचा आकडा 4300 वर...

याबाबत माहिती मिळताच स्थानिक पंच आणि पालयेतील तरूणांनी घटनास्थळी जाऊन या रशियन नागरिकांना जाब विचारला होता. तसेच काळ्या जादुचा हा प्रकार उधळून लावला होता. या घटनेचा व्हिडिओही काही व्हायरल झाला होता.

हे सर्व करण्यासाठी कुणाची परवानगी घेतली, असा सवाल स्थानिक नागरिकांनी रशियन तरूणीला केला, पण तिच्याकडे याचे काहीच उत्तर नव्हते. तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्यावर इतर पर्यटकांनी हळूहळू पळ काढायला सुरवात केली होती.

दरम्यान, असे प्रकार गोव्यात काही ठिकाणी होत असतात. पण पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्यावरून नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com