Two Wheeler Accident near Xavier College Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: रस्ता ओलांडणाऱ्या मुलीला दुचाकीची धडक; ट्रिप्सी जाणाऱ्यांपैकी एक विद्यार्थी गायब

Two Wheeler Accident near Xavier College: अपघातात मुलीच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून तिला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे

Akshata Chhatre

म्हापसा: वाहतुकीचे नियम न पाळता भरधाव वेगाने गाडी चालवल्याने अनेकवेळा इतरांना फटका बसतो. सेंट झेवियर कॉलेज, गणेशपुरी म्हापसा येथील रस्त्यावर दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या मुलांनी रस्ता ओलांडणाऱ्या एका मुलीला मंगळवारी (दि. १० डिसेंबर) रोजी धडक दिली. या अपघातात मुलीच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून तिला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

मुलीला धडक दिल्यानंतर दुचाकी घसरून समोर असलेल्या विजेच्या खांबाला धडकली आणि यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. तिघे दुचाकीस्वार कोण होते याचा अजून पत्ता लागलेला नाही, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ते तीन तरुण, विद्यार्थी असण्याची शक्यता आहे.

रस्ता ओलांडणाऱ्या मुलीला जबर धडक दिल्यानंतर तिघांपैकी एकजण फरार झाल्याचंही स्थानिक म्हणाले आहेत. अपघात झालेली गाडी घेऊन दुचाकीस्वार गायब झाल्याने पोलीस दुचाकीसह त्या मुलाचा शोध घेत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार हे तीन विद्यार्थी सकाळपासून भरधाव वेगात दुचाकी चालवत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT