
फोंडा: पार-उसगाव येथे बुधवारी (४ डिसेंबर) सकाळी १० वा.च्या सुमारास दोन गाड्यांच्या अपघातात दोघेजण जखमी झाले.
जीए०२ एस १५१४ या क्रमांकाच्या कारने कृषी खात्याच्या जीए०७ जी १३०४ या क्रमांकाच्या जीपगाडीला मागून जोरदार ठोकर दिल्याने या अपघातात कारमधील साकीब शेख (२०) हा चालक तर बाजूला बसलेला अयाम शेख (१७) हे दोघे जखमी झाले. कारचालक साकीब याने कारगाडी भरधाव हाकून हा अपघात केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमींना इस्पितळात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.
मडगाव: कुडचडे येथे झालेल्या एका अपघातात काकोडा-कुडचडे येथील सुरेखा गुरव ही महिला गंभीररित्या जखमी झाली. दक्षिण गोव्याच्या पोलिस मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची ही घटना ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमाराला घडली.
संशयित सुनील लमाणी चालवत असलेल्या कारची धडक रस्त्याच्या बाजूने चालत जात असलेल्या सुरेखा गुरव या महिलेला बसली. अपघातात महिलेच्या (Women) उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून डोक्यालाही मार बसलेला आहे. या अपघातासंबंधी हवालदार लक्ष्मीकांत बोरकर तपास करीत आहेत. कारचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या २८१, १२५ (२) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.