Margao Fire News Dainik Gomantak
गोवा

Margao Fire News: मडगावात आग लागून दोन दुकाने भस्मसात

Margao Fire News: मार्केटमधील चार दुकानांनाही बसली झळ

दैनिक गोमन्तक

Margao Fire News: मडगाव येथील न्यू मार्केट परिसरात गजबजलेल्‍या ठिकाणी एका कपड्यांच्या दुकानाला तसेच फार्मसीला मंगळवारी सकाळी 11.35 च्या सुमारास आग लागल्‍याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. ही आग इतरत्र पसरल्‍याने लगतच्‍या चार दुकानांना झळ बसली. आगीत कोणत्या दुकानाची किती प्रमाणात हानी झाली, याविषयी अहवाल प्राप्त होऊ शकला नाही.

अग्निशमन दलाला तातडीने बोलाविण्‍यात आले. मात्र, अरुंद रस्‍ते आणि रस्‍त्‍यावर अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने यांमुळे आगीचे बंब घटनास्‍थळापर्यंत पोचण्‍यासाठी वेळ लागला, असे या भागातील दुकानदारांनी सांगितले. ही आग दुकानातील ‘एसी’मधील बिघाडामुळे घडली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या पथकाने व्यक्त केला आहे.

हे दुकान चाळवजा जागेत आहे. याठिकाणी पाहणी केल्यानंतर आमदार दिगंबर कामत म्हणाले की, मार्केटमधील दुकानांची रेलचेल आटोक्याबाहेर गेली आहे. या प्रकरणी नगरपालिका, जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन, आरटीओ व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलाविण्याची मागणी केली आहे. याप्रश्नी तोडगा काढणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

या ठिकाणी आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या प्रमुखाने सांगितले की, वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या कारणाने या ठिकाणी यायला उशीर झाला. हा प्रश्न व्‍यापारी संघटनेचे अध्‍यक्ष विनोद शिरोडकर यांनी उपस्थित केला होता आणि अग्निशमन दलाच्या गाडीने एक तास उशीर लागला, असा आरोपही केला. मात्र, या दुर्घटनेत किती दुकानांचे नुकसान झाले, याविषयी माहिती प्राप्त झालेली नाही.

यंत्रणेचा अभाव

न्यू मार्केट असोसिएशनचे अध्‍यक्ष विनोद शिरोडकर म्हणाले की, या मार्केटमधील दाटीवाटीने उभारलेली दुकाने आणि येथे येणाऱ्या ग्राहकांची लक्षात घेता येथे अद्ययावत अग्निशमन यंत्रणा बसविण्याची आमची ३५ वर्षांपासूनची मागणी होती, त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यामुळे येथे वारंवार अशा दुर्घटना घडल्या आहेत.

मडगाव न्यू मार्केटमधील आजची आगीची घटना ही गोव्यातील विविध ठिकाणी पसरलेल्या ‘टिकिंग बॉम्ब’चा आणखी एक इशारा आहे. सरकारने पुढच्या धोक्याची जाणीव ठेवून सुधारणात्मक पावले उचलण्याची वेळ आली आहे.
- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT