Mopa Airport In Goa: दाबोळीसह मोपावरील वेळापत्रक कोलमडले

Mopa Airport In Goa: ‘मिग-29’ विमानाचे टायर फुटल्याने तारांबळ
Manohar International Airport Mopa Goa
Manohar International Airport Mopa GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Mopa Airport In Goa: दाबोळीवर आज दुपारी 12.14 च्‍या सुमारास ‘मिग-29’ या लढाऊ विमानाचा टायर फुटल्याची घटना घडली. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. त्‍यानंतर धावपट्टी चार तास लँडिंगसाठी बंद ठेवण्‍यात आली. दाबोळीवर उतरणारी 11विमाने मोपा, हैदराबाद, मुंबई येथे वळविण्‍यात आली.

Manohar International Airport Mopa Goa
Datta Jayanti 2023: गोव्यातलं जागृत दत्त मंदिर..! इथं भक्तांच्या सर्व इच्छा होतात पूर्ण

धावपट्टी दुपारी 3.52 वाजता सुरू झाली; परंतु अन्‍यत्र वळवलेल्‍या विमानांना पुन्‍हा गोव्‍यात उतरण्‍यास जागा मिळत नव्‍हती. त्‍यामुळे शेकडो प्रवाशांना मन:स्‍ताप झाला.

उपरोक्‍त प्रकारामुळे मोपावरील वेळापत्रकही विस्‍कळीत झाले. अनेकांनी या प्रकारासंदर्भात ‘ट्टीट’द्वारे संतप्‍त भावना व्‍यक्‍त केल्‍या.

पूर्ण दिवसभरात मोपा व दाबोळीवरून इतरत्र जाणारी विमाने किमान 6 तास विलंबाने मार्गस्‍थ होत होती. दुर्दैवाने झालेल्‍या प्रकारानंतर प्रवाशांना योग्‍य प्रकारे माहिती देण्‍यात आली नव्‍हती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दाबोळी विमानतळावर मंगळवारी दुपारी 12:30 वाजता नियमित सराव करणाऱ्या ‘मिग-29’ या जेट लढाऊ विमानाचा टायर फुटून त्याला आग लागली. यावेळी विमान एका बाजूने

काहीसे कलंडले. मात्र, नौदलाच्या बचाव पथकाने, अग्निशमक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. प्रवासी विमानोड्डाण सुरू होण्याच्या वेळीच धावपट्टीवर ही दुर्घटना घडली.

या दुर्घटनेनंतर इतर ठिकाणांहून येणारी सुमारे 11 प्रवासी विमाने नजीकच्या मोपा विमानतळावर आणि देशातील इतर विमानतळांवर वळवण्यात आली. दुपारी ४.३० वाजेपर्यंत धावपट्टी लॅंडिंगसाठी बंद ठेवण्यात आली. टायर फुटून लढावू विमान धावपट्टीवर अडकल्याने क्रेनच्या मदतीने ते बाजूला करण्यात आले. धावपट्टीची पूर्ण तपासणी करून सायंकाळी ४.३० च्या सुमारास विमानतळावरील सेवा पूर्ववत करण्यात आली. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचा शोध सुरू आहे.

Manohar International Airport Mopa Goa
Mangeshi Temple In Goa: ऐतिहासिक वास्तूंप्रमाणे, स्थापत्य आणि सांस्कृतिक महत्त्व जपलेले गोव्यातील मंगेशी मंदिर

घटनाक्रम असा...

1 ‘मिग-२९’चा टायर फुटल्‍याने बंद केलेल्‍या धावपट्टीमुळे परिणाम.

2 मुंबई, हैदराबादला वळवलेल्‍या विमानांना माघारी परतण्‍यास विलंब.

3 गोव्‍यातून अन्‍य ठिकाणी जाणारी विमाने चार ते सहा तास ‘लेट’.

मोपाहून मुंबईला जाणारी फ्‍लाईट 4 वाजता सुटणार होती. रात्रीचे 8 वाजून केले तरी तिचा पत्ता नाही.

- जय भानुशाली, अभिनेते.

विमाने उशिरा सुटतात हे समजू शकतो; परंतु विमानतळावर बसायला जागा नाही, याला म्‍हणावे?

- संजय गुप्‍ता, प्रवासी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com