Siolim fire Dainik Gomantak
गोवा

Siolim fire: शिवोलीत अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे दुर्घटना टळली, आंब्याच्या झाडाला लागलेली आग आटोक्यात

लगतच लोकवस्ती असून आग लागलेले झाड जर कोसळले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.

गोमन्तक डिजिटल टीम

Siolim fire शिवोली बामन वाडो येथील एका मोठ्या वाळलेल्या आंब्याच्या झाडाला आग लागल्याची घटना घडली. ही आग दुपारी 3 च्या सुमारास लागल्याची माहिती अग्निशामक दलाकडून प्राप्त झाली.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, एका खाजगी मालमत्तेची साफसफाई करताना आग लावण्यात आली असावी. मात्र तीव्र ऊन आणि वारा यामुळे ही आग वाढत गेली आणि या कंपाउंडच्या भिंतीलगत असलेल्या वाळलेल्या आंब्याच्या झाडाला लागली.

Siolim fire

आगीची तीव्रता एवढी होती की, या झाडाने पूर्णतः पेट घेतला. घटनेचे गाम्भीर्य लक्षात घेऊन स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने म्हापसा अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

सदर घटनास्थळी जाण्याचा रस्ता अरुंद असल्याने बंब पोहोचण्यास अडचण येत होती मात्र अखेर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

या घटनास्थळा लगतच लोकवस्ती असून आग लागलेले झाड जर कोसळले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.

मात्र अग्निशामक दलाच्या कार्यतत्परतेमुळे दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT