37th National Games Goa  Dainik Gomantak
गोवा

37th National Games Goa: काही तासांच्या पावसाचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला फटका

37th National Games Goa: मुखर्जी स्टेडियमला गळती : आजच्या सामन्यांवर संकट

दैनिक गोमन्तक

37th National Games Goa: पणजी मंगळवारी सायंकाळी अचानक गडगडाटासह आलेल्या पावसाच्या सरींनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांची पुरती दाणादाण उडवली. रात्री उशिरापर्यंत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांना पावसाने केलेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पणजी, फोंडा, मडगाव अशी धावाधाव करावी लागली. कांपालची क्रीडानगरी चिखलात बुडाली असून उद्या (ता.१) क्रीडा स्पर्धा नियोजित वेळेत सुरू होतील का, याबाबत शंका आहे.

पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन स्पर्धेची ठिकाणे खेळण्यायोग्य बनवण्यासाठी 160 जणांना नियुक्त केले असून रात्रभर हे काम सुरू असेल. पावसाने काही वेळापुरतीच पण जोरदार हजेरी लावल्याने कांपाल येथील क्रीडा नगरीचे रूपांतर चिखलाच्या मैदानात झाले.

त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने पाणी साचून राहिले. वातावरण निर्मितीसाठी लावलेल्या साहित्याची पडझड झाली असून काही वस्तू भिजून खराब झाल्या. त्या रातोरात बदलण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. उद्या सकाळी या क्रीडानगरीचे नेमके किती नुकसान झाले, हे समजू शकेल.

बांबोळीतील स्पर्धा अर्ध्यावरच

फर्मागुढी येथे गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात तिरंदाजी स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेलाही पावसाचा फटका बसला. खुल्या जागेतील या स्पर्धास्थळी चिखल झाला. त्यामुळे उद्या (बुधवारी) तिरंदाजी स्पर्धा घेता येणार की नाही, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. बांबोळी येथील ॲथलेटीक्स स्टेडियमवर पावसामुळे स्पर्धा पूर्ण करता आली नाही. ताळगाव येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या छताला गळती लागली. त्यामुळे या स्टेडियमचे स्पर्धेपूर्वी केलेले नूतनीकरण चर्चेत आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: गोवा नाईटक्लब आग प्रकरण; बर्च बाय रोमिओ लेनच्या सहमालकाची जामिनासाठी कोर्टात धाव

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

SCROLL FOR NEXT