ED Raid Goa Casino:
ED Raid Goa Casino:Dainik Gomantak

Goa Casino Raid: ईडीची कारवाई सीसी टीव्ही फुटेज तसेच दस्तावेज ताब्यात

Goa Casino ED Raid: ईडीची कारवाई: कॅसिनोंमध्ये समाजविघातक प्रवृत्ती! कॅसिनोचालकांनी ईडीला सर्वतोपरी साहकार्य

ED Raid Goa Casino: गोव्यातील कॅसिनोमध्ये काही समाजविघातक प्रवृत्ती येऊन गेल्या आहेत याचा सुगावा लागल्याने सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कॅसिनोची तपासणी केलीच, त्याशिवाय त्यांच्या आस्थापनांतील सर्व सीसी टीव्ही फुटेज यंत्रसामग्री तसेच काही महत्त्वाचे आर्थिक दस्तावेज ताब्यात घेतले आहेत.

ED Raid Goa Casino:
Psoriasis Skin Problem: आता सोरायसिसचा थेट हृदयावर परिणाम? जाणून घ्या लक्षणे

विश्‍वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, देशातील काही विघातक प्रवृत्ती कॅसिनोमध्ये गेल्या महिन्यात येऊन गेल्या याची माहिती ईडीला मिळाली होती.

या प्रवृत्तींनी पैसा कोठून आणला, त्यांना कोणत्या मार्गाने पैसा मिळतो, शिवाय हा काळा पैसा कसा अधिकृत चलनात आणला जातो याची माहिती घेतली जात आहे.

कॅसिनोचालकांनी ईडीला सर्वतोपरी साहाय्य करण्याचे वचन दिले आहे. दरम्यान, पणजी शहरातील काही तारांकित हॉटेल्स तसेच मांडवी तीरावरील

ED Raid Goa Casino:
Goa Fraud Case: 21 कोटींना गंडविले! अधिक परताव्याचे आमिष दाखवून 100 जणांची फसवणूक

सीसी टीव्ही फुटेज, दस्तावेज ताब्यात

तरंगत्या कॅसिनोच्या आस्थापनांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारांचे दस्तावेज ताब्यात घेण्याबरोबरच आस्थापनांच्या अधिकाऱ्यांच्या जबान्या नोंदवून घेतल्या आहेत

या छापेमारीमुळे राज्यातील इतर काही उद्योजकांचेही धाबे दणाणले आहेत. काल संध्याकाळी सुरू झालेली ही छापेमारी आज पहाटेपर्यंत सुरू होती.

उद्योजकांमध्ये खळबळ

पणजीतील काही हॉटेलांतील कॅसिनोंमध्ये ईडीने छापे टाकले. गोव्यात मोठ्या प्रमाणात देशभरातील काही व्यावसायिक तसेच उद्योजक कॅसिनोवर उपस्थिती लावत असल्याने काळ्या पैशांची मोठी उलाढाल होत असल्याने ईडीने गोव्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

या छापेमारीवेळी ईडीने गोव्यातील ईडी अधिकाऱ्यांची व साध्या वेशातील गोवा पोलिसांची मदत छापेमारीवेळी सुरक्षा ठेवण्यासाठी घेतली होती. गोव्यात तसेच गोव्याबाहेर व्यवसाय व उद्योग असलेल्या उद्योजकांमध्ये ईडीच्या या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com