Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ‘फ्राईड राईस’ ऑर्डरच्या वादातून ग्राहकाला मारहाण, नागवे येथील घटना

नागवे ग्रामस्थांचा पोलिस स्थानकावर धडक मोर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime नागवे येथील एका रेस्टॉरंटमध्ये ‘फ्राईड राईस’ची ऑर्डर दिल्यानंतर ग्राहक अमोल खांडेपारकर यांनी हॉटेलमालकाला पैसे किती झाले, असे विचारले.

कामगाराने सांगितलेला दर आणि मालकाने सांगितलेला दर यात फरक असल्याने अमोल यांनी विचारणा केली असता मालक आणि त्यांच्यात वाद झाला.

या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. मालक प्रदीप पार्सेकर याने ग्राहक अमोल यांच्यावर कामगारांसह हल्ला चढविल्याने अमोल बेशुद्ध झाले.

त्यानंतर नागवे ग्रामस्थांनी पोलिस स्थानकावर मोर्चा नेत ते रेस्टॉरंट बंद करण्याची मागणी केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

सोमवारी रात्री अमोल खांडेपारकर हे या रेस्टॉरंटमध्ये फ्राईड राईस घेण्यासाठी गेले. ऑर्डर दिल्यानंतर त्यांनी त्याचे किती पैसे झाले, असे विचारले. त्यावेळी एका कामगाराने त्यांना 120 रुपये झाल्याचे सांगितले.

मात्र, ऑर्डर घेताना बारमालक दीपक पार्सेकर याने 150 रुपये बिल झाल्याचे सांगितले. बिलात अशी तफावत का, असे विचारल्यानंतर पार्सेकर याने अमोल यांच्यावर दांड्याने हल्ला केला. वेटर बिरो काळे आणि कुक राजेश सावंत या दोघांनीही त्यांना मारहाण केली.

स्थानिक आक्रमक

नागवेतील या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. वाळपई पोलिस स्थानकात ग्रामस्थांनी त्या तिघांना अटक करण्याची मागणी केली. संतप्त गावकऱ्यांनी ठाण्यात गर्दी करत पोलिसांना धारेवर धरले.

त्यानंतर बारचालक प्रदीप पार्सेकर, बिरो काळे, राजेश सावंत तिघांवरही गुन्हा नोंद करून अटक केली. खांडेपारकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Midterm Elections Result: महागाई, भ्रष्टाचार अन् इराण युद्ध पडले महागात! ट्रम्पला अमेरिकन जनतेचा मोठा दणका; डेमोक्रॅट्सचा दणदणीत विजय

Modi Cabinet Decision: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची खूशखबर! अग्निवीरांना मिळणार 2 वर्षांचा सेवा विस्तार; लाखो जवानांना मोठा दिलासा

VIDEO: "हे सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी होतं!", अर्शदीपच्या खास 'डान्स स्टेप'चा व्हिडिओ तुफान व्हायरल; चाहत्यांचं जिंकलं मन

कर्तव्यात कसूर अन् युद्धनौका धोक्यात आणल्याचा ठपका! INS ब्रह्मपुत्र दुर्घटनेप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल; भारतीय नौदलाची मोठी कारवाई

Toll Tax New Rules: टोल प्लाझावर थांबण्याची गरजच नाही! NHAI चा नवा नियम लागू, हायवेवर आता मिळणार 'ट्रॅफिक जाम'पासून मुक्ती

SCROLL FOR NEXT